शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मस्तच! १ लाखावर ४० हजारांचा फायदा; PM मोदीही घेतायत पोस्टाच्या 'या' स्कीमचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 2:45 PM

1 / 9
पोस्ट ऑफीसच्या बचत योजनांमध्ये चांगला परतावा (returns) मिळतो. याशिवाय या योजना अतिशय सुरक्षित देखील मानल्या जातात. पोस्टाची अशीच एक योजना आहे की ज्यात १ लाख रुपयांची गुंतवणूक केली की त्यावर तब्बल ४० हजार रुपयांपर्यंत व्याज मिळतं आणि याच योजनेमध्ये खुद्द पंतप्रधान मोदींनीही गुंतवणूक केली आहे.
2 / 9
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificates) नावाची पोस्टाची जबरदस्त योजना आहे. याची मुदत कालावधी ५ वर्षांची आहे आणि यात तुम्हाला ६.८ टक्के व्याज मिळते. व्याजाची आकारणी वार्षिक स्वरुपात केली जाते.
3 / 9
तुम्ही जमा केलेल्या रकमेवर व्याज हे मात्र जमाराशीची मुदत संपल्यावरच जमा केलं जातं. विशेष म्हणजे या स्कीममध्ये तुम्ही कमीत कमी १ हजार रुपये गुंतवू शकता. त्यामुळे १०० च्या गुणाकारात रक्कम गुंतवता येते.
4 / 9
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमधील गुंतवणुकीचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला आयकरात ८० सी अंतर्गत सुट देखील मिळवता येते. ८० सीची मर्यादा तब्बल १.५० लाख रुपयांपर्यंत आहे.
5 / 9
पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला ६.८ टक्के व्याज मिळते. उदा. तुम्ही या स्कीम अंतर्गत १ हजार रुपयांची गुंवणूक केली असता मुदतीनंतर तुम्हाला १३८९.४० रुपये मिळतात. म्हणजेच तुम्हाला ३८९.४९ रुपयाचा लाभ होतो. याचप्रमाणं १० हजार गुंतवले तर ३८९० रुपये आणि १ लाख रुपये गुंतवले तर ३८,९४९ रुपये तुम्हाला व्याज स्वरुपात मिळू शकतात.
6 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार मोदींनी या स्कीममध्ये ८४,३२१ रुपये गुंतवले आहेत.
7 / 9
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम तुम्हाला फक्त पोस्ट ऑफीसमध्ये जाऊनच सुरू करता येईल.
8 / 9
विशेष म्हणजे, या स्कीममध्ये तीन लोक सामायिक खात्याच्या रुपातही (जॉइंट अकाऊंट) गुंतवणूक करू शकतात.
9 / 9
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना तुम्हाला ५ वर्षांची मुदत संपण्याआधी बंद करता येत नाही. मात्र, स्कीम धारकाचा मृत्यू झाल्यास ती बंद करता येऊ शकते.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसbankबँकNarendra Modiनरेंद्र मोदी