शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

LIC Policy असणाऱ्यांची मजाच मजा; कंपनी देतेय पूर्ण 27 लाख रुपये, पटापट करा एवढं एक काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 9:51 AM

1 / 6
एलआयसी पॉलिसी (LIC Policy) घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. जर आपणही एखादी एलआयसी पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही आपल्याला एका अशा पॉलिसीसंदर्भात माहिती देणार आहोत, जिच्या माध्यमाने आपण 27 लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम तयार करू शकतात. या एलआयसी प्लॅनचे नाव आहे, जीवन उमंग पॉलिसी.
2 / 6
कुणाला करता येईल गुंतवणूक - जीवन उमंग पॉलिसीच्या माध्यमाने आपणम लोखो रुपयांचा फंड तयार करू शकतात. ही स्किम इतर स्किमच्या तुलनेत अत्यंत वेगळी आहे. या पॉलिसीत 90 दिवसांपासून ते 55 वर्षांपर्यंतची कुठलीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते.
3 / 6
1302 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल - एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये गुंतवणूकदारांना लाइफ कव्हर बरोबरच मॅच्युरिटीनंतर, एकगठ्ठा संपूर्ण पैसे मिळतात. या पॉलिसीमध्ये आपल्याला दर महिन्याला 1302 रुपयांचे प्रीमियम जमा करावे लागेल. जर आपण दर महिन्याला पैसे टाकले, तर एका वर्षात आपले जवळपास 15298 रुपये होतील.
4 / 6
30 वर्षांपर्यंत जमा करा पैसे - या पॉलिसीमध्ये आपण 30 वर्षांपर्यंत पैसे जमा करू शकतात. या काळात आपला, जवळपास 4.58 लाख रुपयांचा फंड तयार होईल. महत्वाचे म्हणजे, या पॉलिसीत आपल्याला 31व्या वर्षापासून दर वर्षी 40 हजार रुपयांचा परतावा मिळायला सुरुवात होईल.
5 / 6
100 वर्षांपर्यंत मिळेल कव्हरेज - या स्किममध्ये गुंतवणूकदारांना जवाळपास 100 वर्षांपर्यंचे कव्हरेज मिळते. मॅच्युरिटीनंतर, आपले दरवर्षी निश्चित इनकम सुरू होते. तसेच, जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला, तर अशात, त्याच्या घरच्यांना अथवा नॉमिनीला एक गठ्ठा पैसे मिळतात.
6 / 6
पॉलिसीची वैशिष्ट्य - एलआयसी पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे, मार्केटमधील चढ उताराचा यावर कसलाही परिणाम होत नाही. याशिवाय, चांगल्या परताव्यासह आपल्याला पैशांची गॅरंटीही मिळते. याशिवाय आपल्याला इनकम टॅक्समधूनही सूट मिळते.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा