LIC च्या ‘या’ प्लॅनमध्ये रोज गुंतवा २९ रूपये, मॅच्युरिटीवर मिळतील ४ लाख; पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 5:31 PM
1 / 5 LIC Aadhaar Shila: आपण सर्वजण चांगल्या भविष्यासाठी आपले पैसे वाचवतो. मात्र, या महागाईच्या युगात बचत केलेल्या पैशाचे मूल्य हळूहळू कमी होत आहे. अशा परिस्थितीत, योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. आज आम्ही एलआयसीच्या अशा खास स्कीमबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. या पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला जबरदस्त रिटर्न्स मिळतील. 2 / 5 भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) महिलांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन आधारशिला योजना सुरू केली होती. ८ ते ५५ वर्षे वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दररोज २९ रुपये जमा केल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर ४ लाख रुपये मिळू शकतात. या योजनेबद्दल जाणून घेऊया. 3 / 5 आधारशिला पॉलिसी केवळ महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या विशेष पॉलिसीमध्ये ८ वर्षे वयोगटापासून ते ५५ वर्षे वयोगटातील महिला आपली रक्कम गुंतवू शकतात. या पॉलिसीमध्ये महिलांना अनेक प्रकारे फायदे मिळतात. उदाहरणार्थ, या पॉलिसीमध्ये, कोणतीही महिला किमान ७५ हजार रुपये आणि कमाल ३ लाख रुपयांचा विमा खरेदी करू शकते. 4 / 5 एलआयसीच्या या योजनेअंतर्गत तुम्ही तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर गुंतवणूक करू शकता. या योजनेअंतर्गत, तुम्ही किमान १० वर्षे आणि जास्तीत जास्त २० वर्षे गुंतवणूक करू शकता. तुम्ही २० वर्षांसाठी दरमहा ८९९ रुपये जमा केल्यास, तुमच्या पहिल्या वर्षी फक्त १०,९५९ रुपये जमा होतील. यावर तुम्हाला ४.५ टक्के कर भरावा लागेल. 5 / 5 त्याच वेळी, या योजनेत कोणतीही आयकर सूट उपलब्ध नाही. जर तुम्ही २० वर्षांसाठी दरमहा ८९९ रुपये जमा केले तर २० वर्षात तुम्ही एकूण २ लाख १४ हजार रुपये गुंतवाल. ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर ३ लाख ९७ हजार रुपये मिळतील. आधारशिला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत तिच्या घरातील सदस्यांना निश्चित रक्कम दिली जाईल. आणखी वाचा