शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Share Market Investment: अस्थिर बाजारात ‘येथे’ करा गुंतवणूक अन् व्हा श्रीमंत; अधिक रिटर्न नेमके कुणी दिले? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 11:43 AM

1 / 9
लोकमत न्यूज नेटवर्क: शेअर बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे जास्त लाभांश देणारे स्टॉक्स आणि डिव्हिडंड यील्ड फंडांची मागणी वाढली आहे.
2 / 9
गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात लाभांश देणाऱ्या सरकारी आणि खासगी कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत आहेत. नेमके कोणते फंड चांगले हे जाणून घेऊ...
3 / 9
अनेक वर्षांसाठी गुंतवणूक करून मोठा फायदा - काही फंडांनी गेल्या ५-१० वर्षांत गुंतवणूकदारांना ९.७१ टक्के ते १२.८१ टक्केपर्यंत परतावा दिला आहे. त्यामुळे डिव्हिडंड फंडमधील गुंतवणूक दीर्घकाळासाठी ठेवल्यास त्याचा अधिक फायदा होतो. अधिक रिटर्न नेमके कुणी दिले?
4 / 9
गेल्या एका वर्षात, डिव्हिडंड यील्ड फंडांनी सुमारे ४ टक्के आणि पीएसयू इक्विटी फंडांनी ७.५ टक्के रिटर्न दिले आहेत. तर तर सेन्सेक्स आणि निफ्टीने ३ टक्क्यांपेक्षा कमी रिटर्न दिले आहेत.
5 / 9
फ्लेक्सिकॅप फंडांनी या कालावधीत फक्त ०.१२ टक्के रिटर्न दिले आहेत. बाजारातील मंदीच्या काळात, डिव्हिडंड यील्ड फंड इक्विटी फंडांपेक्षा कमी धक्का देतात.
6 / 9
त्याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना होतो. डिव्हिडंड यील्ड फंडांनी अतिशय संकटाच्या काळामध्येही गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे.
7 / 9
वेदांता ८९ टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर ९० टक्के, एचसीएल टेक ८८ टक्के, हिंदुस्थान झिंक ७९ टक्के, पॉवर ग्रीड ६१ टक्के, कोल इंडिया ६० टक्के, इंडियन ऑइल टक्के, एनटीपीसी ४१ टक्के, टीसीएस ४१ टक्के, ओएनजीसी २९ टक्के या कंपन्यांनी दिला सर्वात अधिक डिव्हिडंड दिला.
8 / 9
कुठे होते गुंतवणूक? सरकारी अथवा मोठ्या कंपन्या खासकरून लाभांश देतात. डिव्हिडंड फंड्स याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. हे फंडस् आयटी, आर्थिक सेवा, आरोग्य या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूक करतात.
9 / 9
त्यांना किमान ६५ टक्के डिव्हिडंड देणाऱ्या समभागांमध्ये गुंतवणूक करावी लागते. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना होतो. यामुळे नुकसानीच्या काळातही ते फायद्यात राहतात.
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक