शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Government Investment Scheme : ‘या’ सरकारी स्कीममध्ये करा इतकी गुंतवणूक, २१ व्या वर्षी मुलीला मिळतील ६५ लाख

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 10:23 AM

1 / 9
केंद्र सरकार मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना राबवत आहे. या अल्पबचत योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकतात. सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन योजना आहे.
2 / 9
यामध्ये गुंतवणूक करून पालक आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे जमा करू शकतात. अलीकडेच सरकारनं या योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे. चालू तिमाहीसाठी सरकारनं व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के केला आहे.
3 / 9
सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी २१ वर्षे आहे. परंतु पालकांना सुरुवातीच्या १५ वर्षांसाठीच पैसे जमा करावे लागतील. पैसे जमा न करता खाते सहा वर्षे चालू राहत.
4 / 9
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत १० वर्षांखालील मुलींचं खातं त्यांच्या पालकांच्या नावावरच उघडलं जातं. या योजनेअंतर्गत तुम्ही वार्षिक २५० ते १.५० लाख रुपये जमा करू शकता.
5 / 9
यापूर्वी, या योजनेत 80C अंतर्गत केवळ दोन मुलींच्या खात्यावर कर सूट उपलब्ध होती. मात्र काही महिन्यांपूर्वी या योजनेचे नियम बदलण्यात आले असून आता एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली असल्यासही त्यांच्या खात्यावरही करात सूट दिली जाणार आहे.
6 / 9
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खातं उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना खात्यातील गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेद्वारे स्वीकारल्या जाणार्‍या इतर कोणत्याही प्रकारे जमा केली जाऊ शकते.
7 / 9
सुकन्या समृद्धी योजना २१ वर्षांनी मॅच्युअर होते. मात्र, मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून शिक्षणासाठी रक्कम काढता येईल. संपूर्ण रक्कम २१ वर्षांनंतरच काढता येते.
8 / 9
फेब्रुवारी २०२३ पर्यंत या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ३ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. मुलींचं भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशानं २०१५ मध्ये सरकारन ही योजना सुरू केली.
9 / 9
जर एखाद्या पालकानं मुलीच्या जन्मापासून दरमहा १२,५०० रुपये गुंतवले तर एका वर्षात त्यांचे १,५०,००० लाख रुपये जमा होतील. अशा प्रकारे ते १५ वर्षांत २२,५०,००० रुपयांची गुंतवणूक करतील. आता ७.६ टक्के जुन्या व्याज दरानुसार टाकली तर ४३,४३,०७१ रुपये व्याज म्हणून मिळतील. अशाप्रकारे, योजना मॅच्युअर होईपर्यंत ती व्यक्ती आपल्या मुलीसाठी ६५,९३,०७१ रुपये जमा करेल.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा