शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलांसाठी LIC चा 'हा' प्लॅन ठरेल बेस्ट; दररोज १५० रुपयांच्या बचतीवर मिळतील १९ लाख, पाहा कसे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2022 3:36 PM

1 / 9
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी (LIC) सातत्यानं लोकांसाठी अनेक स्कीम्स आणत असते. ज्यामध्ये लोकांना गुंतवणूक करून चांगला फायदा मिळतो. येथे लोकांना विम्याबरोबरच चांगला परतावाही मिळतो.
2 / 9
मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक करायची असेल तर LIC नं एक उत्तम स्कीम आणली आहे. याच्या माध्यमातून त्‍यांचे भवितव्‍य सुरक्षित होईल किंवा त्‍याला नोकरी मिळेपर्यंत अधिक पैसे मिळू शकतील.
3 / 9
हा एकप्रकारचा चिल्ड्रेन मनी बॅक प्‍लॅन (New Children Money Back Plan) आहे. यामध्ये दररोज १५० रुपयांची बचत केल्यास तुमच्या मुलाच्या भविष्यात त्याचा चांगला फायदा मिळू शकतो. या प्लॅनबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ.
4 / 9
तुम्हीही या योजनेअंतर्गत तुमच्या मुलांसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यामध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गुंतवणूक करू शकता. आयुर्विमा महामंडळाची नवीन चिल्ड्रेन मनी बॅक प्लॅन पॉलिसी २५ वर्षांसाठी घेतली जाते.
5 / 9
यामध्ये, मॅच्युरिटी रक्कम तुम्हाला हप्त्यांमध्ये दिली जाते. तुमचे मूल १८ वर्षांचे असताना पहिल्यांदा, दुसऱ्यांदा २० वर्षांचे झाल्यावर आणि तिसर्‍यांदा २२ वर्षांचे झाल्यावर याची रक्कम दिली जाते.
6 / 9
या योजनेअंतर्गत, आयुर्विमाधारकाला विम्याच्या रकमेच्या २०-२० टक्के रक्कम मनी बॅक टॅक्स म्हणून मिळते. यासोबतच मूल 25 वर्षांचे झाल्यावर त्याला संपूर्ण रक्कम दिली जाते. उर्वरित ४० टक्के रकमेसोबत बोनसही दिला जातो. म्हणजेच, जर एखाद्याने या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर जास्तीत जास्त परतावा मिळू शकतो.
7 / 9
ही पॉलिसी मुलांच्या जन्मापासून ते १२ वर्षांपर्यंत घेता येते. या पॉलिसीमध्ये ६० टक्के रक्कम ही हप्त्यांमध्ये आणि ४० टक्के रक्कम मॅच्युरिटीच्या वळी बोनससोबत देण्यात येईल. या अंतर्गत कमीतकमी १ लाख रुपयांचा विमा घेतला जाऊ शकतो. यासाठी कमाल मर्यादा नाही. जर यासाठी हप्त्यांमध्ये रक्कम भरायची नसल्यास एकत्रही रक्कम भरता येते.
8 / 9
जर या पॉलिसीअंतर्गत जर कोणीही दररोज १५० रुपयांची बचत करत असेल तर त्याची वार्षिक जमा रक्कम ५५ हजार रुपये होईल. याचाच अर्थ ३६५ दिवसांनुसार २५ वर्षांमध्ये १४ लाख रुपये जमा करावे लागतील.
9 / 9
जर तुम्ही १४ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला १९ लाख रूपये मिळतील. जर तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढायचे नसतील, तर तुम्हाला बोनससोबत एकत्रच मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर रक्कम दिली जाते.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीMONEYपैसा