शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पैसे गुंतवा, दरमहा कमवा, ऐटीत जगा! निवृत्तीनंतरही व्हा मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:24 AM

1 / 9
निवृत्त झाल्यानंतर दरमहिन्याला येणारी मिळकत बंद होते. रोजचा खर्च तसेच आजारपण आदी कारणांसाठी इतर कुणावर विसंबून राहणे शक्य नसते. त्यामुळे आयुष्यभर केलेली बचत, निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आणि पेन्शन यावरच अवलंबून राहावे लागते.
2 / 9
अशा वेळी केलेली बचत सुरक्षित राहावी आणि त्यातून काही पैसे मिळावे, अशी अपेक्षा असेल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा चांगला पर्याय आहे.
3 / 9
एससीएसएसमध्ये गुंतविलेले पैसे सुरक्षित राहतातच, परंतु यातून ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला २० हजार रुपयांचे उत्पन्नही मिळू शकते. या बचतीवर ८.२ टक्के दराने चक्रवाढ पद्धतीने व्याजही दिले जाते.
4 / 9
ही योजना वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्यांसाठी तयार करण्यात आली आहे. निवृत्त झालेले किंवा व्हीआरएस घेतलेले नागरिक यात पैसे गुंतवू शकतात. यासाठी त्या व्यक्तीचे वय ५५ ते ६० च्या दरम्यान असले पाहिजे.
5 / 9
सैन्यात नोकरीनंतर निवृत्त झालेले नागरिकही या योजनेत सहभागी होऊ शकतात. विशेष बाब म्हणून वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या माजी सैनिकांना या योजनेत आपले पैसे गुंतवण्याची मुभा दिली जात असते.
6 / 9
तुमच्या परिसरातील कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसात यासाठी खाते उघडता येते. खात्यात किमान एक हजार रुपये ते कमाल ३० लाख रुपये जमा करता येतात.
7 / 9
या योजनेत सहभागी होणाऱ्यांना पती किंवा पत्नी यांच्यासह संयुक्त खातेही उघडता येते. या योजनेत पैसे भरण्याची परवानगी प्राथमिक खातेधारकालाच असते.
8 / 9
समजा एखाद्या व्यक्तीने एससीएसएसमध्ये ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तिला ८.२ टक्के इतक्या दराने व्याज चक्रवाढ पद्धतीने दिले जाते. यातून वर्षभरात त्या व्यक्तीला एकूण २.६४ लाख रुपये मिळतात. ही रक्कम महिन्याला २०,५०० रुपये इतकी होते.
9 / 9
एससीएसएसमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला कलम ८०-सी नुसार १.५ लाख रुपयांची सूट दिली जाते. या योजनेसाठी परिपक्वतेची मुदत ५ वर्षांची असते. मुदत पूर्ण झाल्यानंतर यात आणखी तीन वर्षांची वाढ करता येते.
टॅग्स :Investmentगुंतवणूक