invest post office 5 best saving schemes and get double return check how
Post Office : पोस्टाच्या 'या' 5 बचत योजना आहेत खास, गुंतवणुकीवर मिळेल दुप्पट लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 4:01 PM1 / 10नवी दिल्ली : पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) अनेक योजना आहेत की ज्यामुळे छोट्या बचतीतून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो. या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यानंतर ना केवळ तुम्हाला सरकारी गॅरंटी मिळते, तर याशिवाय कर सवलतीचा फायदाही मिळतो. आयकर कायदा सेक्शन 80 सी अंतर्गत वार्षिक 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत मिळते.2 / 10पोस्ट ऑफिसमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या पैशांबाबत चिंता राहणार नाही. पोस्टाच्या छोट्या बचत योजनांमध्ये (Small Saving Scheme) तुम्ही कमी पैशात सुरक्षित गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला काही काळातच निश्चित रिटर्न मिळण्याची गॅरंटी आहे. चला तर जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या काही खास योजना....3 / 10एमआयएस योजनेत एकल किंवा संयुक्त (Single or Joint Account) दोन्हीही पद्धतीची खाती उघडता येतील. वैयक्तिक खाते उघडताना या योजनेत तुम्ही किमान 1,000 आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवू शकता. तथापि, संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. 4 / 10तुम्हाला कमी जोखीम पत्करून गुंतवणूक करायची असेल तर ही योजना बेस्ट आहे. सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेत तुम्हाला व्याज दर 6.6 टक्के मिळत आहे. व्याजाची रक्कम दरमहा तुमच्या खात्यामध्ये दिली जाते. MIS चा कालावधी पाच वर्षांचा आहे. पुढे तुम्ही ही योजना 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता.5 / 10सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (Post Office Senior Citizen Saving Scheme) वरिष्ठ नागरिकांसाठी आहे. या स्कीममध्ये बँक फिक्स्ड डिपाॅझिटपेक्षा जास्त व्याज मिळतं. वरिष्ठ नागरिकांसाठीची पोस्ट ऑफिसची ही स्कीम सर्वात सुरक्षित गुंतवणूक आहे. सध्या या योजनेत 7.4 टक्के दराने व्याज मिळते आहे. यावर मिळणारे व्याज तिमाही आधारावर खात्यामध्ये क्रेडिट केलं जातं. यामध्ये आयकर कायदा सेक्शन 80 सी अंतर्गत वार्षिक 1.5 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सवलत मिळते.6 / 10पोस्टाच्या पाच वर्षांच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये गुंतवणूक केल्यास 6.8 टक्के दराने व्याज मिळते. वार्षिक आधारावर त्याची मोजणी केली जाते. व्याजाची रक्कम मॅच्युरिटीवर मिळते. ही योजना जवळपास फिक्स्ड डिपॉझिटसारखीच आहे. 7 / 10शिवाय यामध्येही PPF प्रमाणे व्याजावर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. यामध्ये पाच वर्षांचा लॉक इन पीरियड असतो म्हणजे तुम्ही हे पैसे पाच वर्षांनंतर काढू शकता.8 / 10या योजनेची मॅच्युरिटी पाच वर्षांची आहे. या योजनेमध्ये कमीततमी 200 रुपयांची गुंतवणूक करण्यास सुरुवात करता येते. या योजनेत पहिल्या 3 वर्षापर्यंत 5.5 टक्क्यांचं व्याज मिळतं. या योजनेत 13 वर्षांनी पैसे दुप्पट होतीत. तर पाचव्या वर्षात यामध्ये 6.7 टक्के दराने व्याज मिळते.9 / 10किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra KVP) ही योजना विशेष प्रसिद्ध योजना आहे. यामध्ये कमीत कमी 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. जास्तीत जास्त गुंतवणुकीची कोणतीही मर्यादा यामध्ये नाही आहे. ही योजना म्हणजे एक सर्टिफिकेट आहे, जे तुम्ही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. 10 / 10हे बाँडप्रमाणे प्रमाणपत्राच्या स्वरुपात दिले जाते. यावर सरकारकडून एक निश्चित व्याज दिले जाते. सरकार या योजनेकरता दर तीन महिन्यांनी व्याज निश्चित करते, सध्या या योजनेसाठी 6.9 टक्के दराने व्याज दिले जात आहे. याआधारे 9 वर्ष आणि 2 महिने अर्थात 110 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील. ही योजना विशेषत: शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications