Invest Rs. 10,000 in Post office scheme; you willget 16 lakhs return in 10 years
Money Saving Tips: पोस्टाच्या या स्कीममध्ये महिन्याला १०००० रुपये गुंतवा; पाहता पाहता होतील १६ लाख By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 4:35 PM1 / 8High Return Giving Scheme: कोरोना व्हायरसमुळे सगळ्या क्षेत्रांत अनिश्चितता पसरली आहे. यामुळे लोक सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचे पर्याय शोधत आहेत. बँकांमध्ये गुंतवणूक करावी तर कमी व्याज मिळते. शेअर बाजारात अधिक परतावा मिळेल पण रिस्क काय थोडी आहे. गेले तर सारेच धडाम. 2 / 8जर तुम्हाला दर महिन्याला १०००० रुपये गुंतवायचे असतील आणि त्याबदल्यात १६लाख रुपये कमवायचे असतील तर आम्ही तुम्हाला एक स्कीम सांगणार आहोत. ही आहे पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिट अकाऊंट (Post Office Recurring Deposit) स्कीम. यामध्ये सुरक्षा सह व्याजाची देखील गॅरंटी असते.3 / 8हे अकाऊंट एफडी सारखे असते. मात्र, पैसे गुंतविण्यासाठी यामध्ये एफडी पेक्षा जास्त सूट मिळते. एफडीमध्ये एकाच वेळी जास्त पैसे गुंतवायचे असतात. तर यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवायची असते. या अकाऊंटवर 5.8 टक्के व्याज मिळते. 4 / 8हे व्याज तिमाहीच्या आधारावर दिले जाते. पोस्ट खात्याही ही स्कीम बाजाराशी जोडलेली नसते. यामुळे यामध्ये रिटर्नची कोणतीही रिस्क नसते. जर तुम्ही पैसे गुंतविले तर तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळतो.5 / 8रिकरिंग डिपॉझिट अकाऊंटमध्ये व्याज हे कंपाउंडिंगच्या हिशेबाने मिळते. जेवढी जास्त मुदत तेवढा जास्त फायदा. यामुळे जेवढ्या जास्त मुदतीसाठी पैसे गुंतवाल तेवढा तुमचा फायदा जास्त असणार आहे. १०च्या पटीने पैसे गुंतविता येतात. पैसे गुंतविण्याची कोणतीही मर्यादा नाही. (Post Office Recurring Deposit Information In Marathi)6 / 8या स्कीममध्ये तुम्हाला १० वर्षांपर्यंत पैसे गुंतवावे लागतील. दर महिन्याला १०००० रुपये जमा करा. याद्वारे १० वर्षांत तुम्ही १२ लाख रुपये जमा कराल. ५.८ टक्क्यांनी तुम्हाला 4,26,476 रुपयांचे व्याज मिळेल. 7 / 8ही रक्कम 16,26,476 रुपये होईल. तुम्ही दर महिन्याला ३००० रुपये जमा केले तर १० वर्षांत ५ लाखांहून अधिक रुपये मिळवू शकता. 8 / 8जर तुम्हाला हवे असेल तर एकापेक्षा जास्त आरडी खाती खोलू शकता. आता एक खाते उघडा, नंतर दुसरे खाते उघडू शकता. फक्त हे खाते कुटुंब किंवा संस्थेच्या नावे उघडता येत नाही. हे खाते एका किंवा दोन व्यक्तींच्या नावावर उघडता येते. आणखी वाचा Subscribe to Notifications