invest rs 200 daily in this scheme of lic 28 lakh funds will be deposited in a few years
LIC Jeevan Pragati Policy: LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये करा रोज २०० रूपयांची गुंतवणूक, मॅच्युरिटीच्या वेळी मिळतील २८ लाख; पाहा कसे.. By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 8:52 AM1 / 9LIC Jeevan Pragati Policy: आपल्या भविष्याची तरतूद म्हणून रक्कम जमा करणं आणि आपल्या मुलाबाळांच्याही भविष्यासाठी पैसे वाचवणं हे आवश्यक आहे. दरम्यान, आपल्या आयुष्याची जमापुंजी ही सुरक्षित हातांमध्ये असणं आवश्यक आहे. 2 / 9जेव्हा तुम्ही आपलं भविष्य सुरक्षित करता तेव्हाच अनेक स्वप्न पूर्ण होऊ शकतात. LIC Of India तुम्हाला बचत आणि सुरक्षेची हमीदेखील देतं. एलआयसी सध्या अशा काही पॉलिसी ऑफर करत आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही कोट्यधीश बनू शकता. तसंच या पॉलिसींच्या माध्यमातून तुम्हाला अन्य कव्हर देखील मिळतात. 3 / 9जीवन प्रगती पॉलिसी ही एलआयसीच्या अनेक पॉलिसींपैकी एक आहे, ज्या ठिकाणी तुम्ही दररोज २०० रूपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर २८ लाख रूपये मिळवू शकता.4 / 9प्रगती पॉलिसीमध्ये नियमित रक्कम भरल्यानंतर तुम्हाला डेथ बेनिफिटही दिलं जातं. तसंच ते दर पाच वर्षांनी वाढवता येतं. याशिवाय तुमची पॉलिसी किती वर्षांसाठी सक्रिय आहे यावरही ही रक्कम ठरवली जाते.5 / 9या पॉलिसीमध्ये गुंतवणूकादारासोबत अनुचित घटना घडली तर त्याच्याद्वारे गुंतवणूक करण्यात येणाऱ्या रकमेनुसार फंड देण्यात येतं. तसंच या पॉलिसीसाठी विमा कव्हर पाच वर्षांसाठी असतं. परंतु गुतवणूकदारांना यात वाढ करायची असल्यास ते वाढ करू शकतात.6 / 9पॉलिसी घेतल्यापासून ५ वर्षांपर्यंत पॉलिसीधारकाच्या मृत्यूवर मूळ विमा रकमेचा १०० परतावा केला जातो. याशिवाय या योजनेत दुर्घटना विमादेखील सामील केला जाऊ शकतो. 7 / 9तसंच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास ६ ते १० वर्षांमध्ये १२५ टक्के, ११ ते १५ वर्षांमध्ये १५० टक्के आणि १६ ते २० वर्षांमध्ये २०० टक्क्यांचा परतावा मिळतो.8 / 9या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची वयोमर्यादा ४५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. जीवन प्रगती पॉलिसीबाबत सांगायचं झालं तर दररोज २०० रूपयांप्रमाणे महिन्याला तुम्ही ६ हजार रूपयांचा प्रीमिअम भरता.9 / 9६ हजार रूपयांचा महिन्याला प्रीमिअम भरल्यानंतर येणाऱ्या पुढील २० वर्षांनंतर तुम्हाला २८ लाख रूपयांचा फंड मिळेल. यासाठी तुम्हाला २० वर्षांसाठी सातत्यानं प्रीमिअम जमा करावा लागणार आहे. ही स्कीम तुम्ही १२ वर्षांपासून सुरू करू शकता आणि याची कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications