Investing in EPF is more profitable than others!
ईपीएफमधील गुंतवणूक इतरांपेक्षा फायदेशीरच! By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 8:12 AM1 / 7कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मिळणारा व्याजदर घटवून ८.१ टक्के केला असला तरी ईपीएफमधील गुंतवणूक अजूनही इतर योजनांच्या तुलनेत फायदेशीर आहे, कसे ते जाणून घेउ. 2 / 7गेल्या वर्षी ईपीएफवरील व्याजदर ८.५% होता. तो नुकताच घटवून ८.१ टक्के करण्यात आला आहे. हा ईपीएफवरील ४० वर्षांतील सर्वांत कमी व्याजदर ठरला आहे. 3 / 7व्याजदर ४० वर्षांच्या नीचांकावर गेल्यानंतर ईपीएफमधील गुंतवणूक खरेच फायदेशीर आहे का, असा प्रश्न या योजनेच्या लाभधारकांच्या मनात निर्माण झाला आहे. 4 / 7सार्वजनिक भविष्य निधीसह (पीपीएफ) इतरही काही योजनांशी तुलनाही लोक करीत आहेत. मात्र, या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, इतर कोणत्याही योजनेच्या तुलनेत ईपीएफची गुंतवणूक अजूनही फायदेशीरच आहे.5 / 7ईपीएफ आणि पीपीएफ या योजनांत अनेक बाबतींत फरक आहे. वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी ईपीएफमधील गुंतवणूक बंधनकारक आहे. विशेष म्हणजे, खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठी हे बंधनकारक आहे. 6 / 7पीपीएफमधील गुंतवणूक मात्र संपूर्णत: ऐच्छिक आहे. पीपीएफ खात्यातील पैशावर ७.१ टक्के व्याज मिळते. ईपीएफमधील पैशांवर १ टक्का अधिक म्हणजेच ८.१ टक्के व्याज मिळते. निवृत्तीनंतर ईपीएफमधील पैसा कर्मचाऱ्यास एकरकमी मिळतो. पीपीएफमधील पैसा १५ वर्षांनंतर एकरकमी मिळतो. 7 / 7ईपीएफमधील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा अजूनही महागाईच्या दरापेक्षा अधिक आहे. त्यामुळे परवाच्या व्याजदर कपातीनंतरही ईपीएफ हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय आहे. - बलवंत जैन, गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ. आणखी वाचा Subscribe to Notifications