Investing in PPF can make you a millionaire! Understand math easily
PPF मध्ये गुंतवणूक केल्यास तुम्ही करोडपती होऊ शकता! गणित सहज समजून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 3:55 PM1 / 9आपणही करोडपती बनू असं अनेकांना वाटतं असतं. अनेकजण यासाठी स्वप्न पाहतात. यासाठी पैशांची साठवणूकही सुरू करतात. पण, मध्यमवर्गीयांसाठी घर खर्च बघून करोडपती होणं अवघड असतं.2 / 9यासाठी गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे. दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला सहज करोडपती बनवू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा.3 / 9तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितके चांगले परतावे मिळतील. चला जाणून घेऊया अशा सरकारी योजनेबद्दल जी तुम्हाला २५ वर्षांत हमखास करोडपती बनवू शकते.4 / 9देशातील सर्वात लोकप्रिय लघु बचत योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सर्वात जास्त फायदा देणारी आहे. या योजनेत तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला त्यावर उत्तम व्याजही मिळेल. 5 / 9पीपीएफ ही एक लोकप्रिय योजना आहे कारण त्यात जमा केलेले पैसे, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. सरकारच्या EEE योजनेत त्याचा समावेश आहे. EEE म्हणजे Exempt. दरवर्षी ठेवींवर कर सवलतीचा दावा करण्याचा पर्याय आहे. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर भरावा लागत नाही. खाते परिपक्व झाल्यावर, संपूर्ण रक्कम करमुक्त असेल.6 / 9या योजनेअंतर्गत, तुम्ही वार्षिक किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता. पीपीएफ खाते परिपक्व होण्यासाठी १५ वर्षे लागतात.7 / 9पीपीएफ बँका आणि पोस्ट ऑफिसमधील मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याज देते. ही योजना १ एप्रिल २०२३ पासून ७.१ टक्के व्याजदर देत आहे.8 / 9कोणताही भारतीय पीपीएफ खाते उघडू शकतो. पीपीएफ योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. जर तुम्हाला ते मॅच्युरिटीनंतरही चालू ठेवायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही पीपीएफ खाते ५ वर्षांसाठी वाढवू शकता.9 / 9PPF योजनेत थोडे पैसे जमा करून तुम्ही करोडपती बनू शकता. सूत्र अगदी सोपे आहे. दररोज फक्त ४११ रुपये म्हणजेच वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवून तुम्ही २५ वर्षांत ७.१ टक्के व्याजदराने १.३ कोटी रुपये कमवू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications