शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कामाची बातमी! 'या' योजनेत गुंतवणूक करुन मालामाल होऊ शकतात; योजनेबद्दल जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2024 3:10 PM

1 / 7
आपल्याकडे भविष्याचा विचार करुन गुंतवणुकीचा विचार केला जातो. भविष्यात तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये म्हणून ही गुंतवणूक केली जाते. यासाठी अनेक जण लोक एलआयसी, सरकारी योजना, मुदत ठेवी इत्यादींमध्ये गुंतवणूक करतात.
2 / 7
तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही अशा योजनेत गुंतवणूक करू शकता, येथून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. ही योजना पोस्ट ऑफिसची आहे, तिथे तुम्ही गुंतवणूक करू शकता.
3 / 7
ही योजना पोस्ट ऑफिसची आहे, याचे नाव 'ज्येष्ठ नागरिक बचत योजना' आहे. या योजनेत फक्त ज्येष्ठ नागरिकच गुंतवणूक करू शकतात. या योजनेअंतर्गत तुम्हाला आधी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला परतावा मिळतो.
4 / 7
या योजनेत गुंतवणूक करणाऱ्याचे किमान वय ६० वर्षे आहे. अशा सरकारी कर्मचाऱ्यांनी ज्यांनी VRS म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे ते ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या असतानाही गुंतवणूक करण्यास पात्र मानले जातात.
5 / 7
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही यामध्ये किमान १,००० रुपये गुंतवू शकता. तर, तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त ३० लाख रुपयांपर्यंतच गुंतवणूक करू शकता.
6 / 7
तुम्हालाही या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे.
7 / 7
पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडे तुम्ही योजनेची माहिती घेऊ शकता. यानंतर तुम्हाला तुमची पुढची प्रकिया करता येईल.
टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसInvestmentगुंतवणूक