शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Child Mutual Fund: मुलांच्या नावानं सुरू करा SIP; महिन्याला ५ हजार गुंतवल्यास मोठं झाल्यावर पाहा किती मिळतील पैसै

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 1:13 PM

1 / 15
सध्या मुलांचं शिक्षण हे फारच खर्चिक होऊ लागलं आहे. विशेष करून मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी पालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो.
2 / 15
आपला पाल्य मोठा अथवा मोठी होईपर्यंत त्यांच्यासाठी चांगली रक्कम जमा करावी जेणेकरून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चास मदत होईल असा अनेकांचा विचार असतो.
3 / 15
यासाठी काही पालक हे गुंतवणूकीच्या काही बचत योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. परंतु सध्या स्मॉल सेविंग्सवर आता रिटर्न कमी झाला आहे.
4 / 15
त्यामुळे आपल्या पाल्यांसाठी आवश्यक असलेली रक्कम तितकी जमवणं शक्य नाही. अशा पद्धतीत चाईल्ड म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
5 / 15
बाजारात अशी अनेक फंड हाऊसेस आहेत जी मुलांसाठी खास म्युच्युअल फंड योजनेचा लाभ देत आहेत. एचडीएफसी, एसीबीआय, अॅक्सिस, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, टाटा आणि युटीआयसारख्या फंडांसाठी लहान मुलांचे प्लॅन्स उपलब्ध आहेत.
6 / 15
जर त्यांच्या रिटर्नबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी गेल्या १५-२० वर्षांमध्ये १२ ते १५ टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.
7 / 15
BPN फिनकॅपच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या नावानं कोणत्याही चांगल्या म्चुच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. ज्यासह केवळ चाईल्ड असं असेल त्याच फंडात गुंतवणूक केली पाहिजे असं काही अनिवार्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं.
8 / 15
याव्यतिरिक्त पालक अन्य म्युच्युअल फंडांचाही पर्याय निवडू शकतात. जर तुम्ही मुलांच्या नावे SIP करत असाल तर मर्यादा किमान १५ वर्ष असावी, असंही त्यांनी नमूद केलं.
9 / 15
HDFC चिल्ड्रेंस गिफ्ट फंडनं लाँचनंतर १६.१६ टक्क्यांचं वार्षिक रिटर्न दिलं आहे. ५००० रूपयांची महिन्याला एसआयपी केल्यात त्यात १५ वर्षानंतर ३० लाख रूपये मिळू शकतात. (source: value research)
10 / 15
ICICI प्रुडेंन्शिअल चाईल्ड केअर फंडनं लाँचनंतर १५.४८ टक्के रिटर्न दिले आहेत. ५ हजार रूपयांच्या महिन्याच्या एसआयपीवर १५ वर्षांनी तुम्हाला २४ लाख मिळू शकतात. (source: value research)
11 / 15
SBI मॅग्नम चिल्ड्रेन बेनिफिट फंडनं लाँचनंतर १०.३६ टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत. ५००० रूपये महिन्याला एसआयपी केल्यास १५ वर्षात २० लाख मिळू शकतात. (source: value research) (या सर्व फंड्सनं बाजारात १५ वर्षे पूर्ण केली आहेत. एसआयपीची गणना आतापर्यंत देण्यात आलेल्या व्याजाच्या आधारावर केली आहे.
12 / 15
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार काही चाईल्ड प्लॅन इक्विटी आणि डेटच्या कंपोझिशनच्या आधारावर गुंतवणूकदारांना निरनिराळे पर्याय देतात.
13 / 15
अधिक जोखीम पत्करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी अधिक डेटवाला पोर्टफोलियो निवडण्याचा पर्याय, तर अॅग्रेसिव्ह गुंतवणूकदारांना अधिक इक्विटी असलेले पोर्टफोलियो निवडण्याचा पर्याय मिळतो.
14 / 15
चाईल्ड प्लॅनसह एक फायदा म्हणजे याला लॉक इन पिरिअड असतो. त्यामुळे एका मर्यादेपर्यंच तुम्ही पैसे काढू शकत नाही.
15 / 15
(नोट : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन आहे. लोकमत कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीची शिफारस करत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी स्वत: माहिती मिळवा किंवा तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या.)
टॅग्स :businessव्यवसायInvestmentगुंतवणूकMONEYपैसा