शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मी ३० वर्षाचा आहे, ४५ वयापर्यंत कोट्यधीश बनेल का?; मग वापरा १५*१५*१५ फॉर्म्युला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 9:45 AM

1 / 10
प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपल्या कमाईतून छोटी बचत करून ती अशा ठिकाणी गुंतवावी जिथे भविष्यात खूप मोठी रक्कम जमा करता येईल. तुम्हीही असाच काहीसा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. खरं तर, आम्ही एका फॉर्म्युलाबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला कोट्यधीश बनता येईल.
2 / 10
होय, जर तुमचे वय ३० वर्षे असेल आणि तुम्हाला वयाच्या ४५ व्या वर्षी कोट्यधीशांच्या श्रेणीत सामील व्हायचे असेल, तर तुम्ही १५X१५X१५ फॉर्म्युला लागू करून हे स्वप्न पूर्ण करू शकता. ते कसे काम करते हे जाणून घेऊया. श्रीमंत बनणं अखेर कुणाला आवडणार नाही. प्रत्येकाची इच्छा असते की त्याच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात आणि भविष्यात त्याला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये.
3 / 10
मात्र, श्रीमंत होण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही, पण आता काळ बदलला आहे. जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षीही गुंतवणुकीबाबत गंभीर असाल तर कोट्यधीश होण्याचे स्वप्न फारसे अवघड नाही, त्यासाठी तुम्हाला फक्त काही नियोजनाची गरज आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी ३० वर्षांच्या व्यक्तीनं फक्त काम करणे आणि त्याच्या कमाईतून १५ वर्षे बचत करणं आवश्यक आहे.
4 / 10
वयाच्या ४५ व्या वर्षी खात्यात १ कोटी रुपयांची मोठी रक्कम जोडण्यासाठी विशेष फॉर्म्युला वापरावा लागतो तो म्हणजे १५x१५x१५ नियम म्हणजे (15*15*15 फॉर्म्युला). या अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही १५ वर्षात एक कोटी रुपये उभे करू शकता आणि याच्या मदतीने व्यवसाय सुरू करणे, घर, कार खरेदी करणे आणि मुलांचे शिक्षण यासह सर्व खर्च तुम्ही कोणत्याही आर्थिक समस्येशिवाय भागवू शकता.
5 / 10
हे विशेष सूत्र म्युच्युअल फंडाशी जोडून दाखवले आहे.आजच्या काळात, जर तुम्ही कोणत्याही आर्थिक सल्लागाराकडे बचत करण्यासाठी आणि मोठा निधी जमा करण्यासाठी गुंतवणूक करण्याच्या टिप्स मिळवण्यासाठी गेलात, तर तो देखील प्रथम म्युच्युअल फंडात SIP करण्याचा सल्ला देतो. कारण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे केवळ सोपे नाही तर प्रचंड परतावाही देते. यामागे कंपाऊंडिंगची ताकद आहे.
6 / 10
१५x१५x१५ फॉर्म्युला अंतर्गत गुंतवणुकीबद्दल बोलायचे तर त्यात तीन १५ आहेत, त्यातील पहिले १५ गुंतवणुकीची रक्कम ठरवतात. म्हणजेच दरमहा १५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. त्यानंतर, दुसरे १५ म्हणजे ही गुंतवणूक १५ वर्षे चालू ठेवावी, तर तिसरी आणि शेवटचे १५ म्हणजे त्या गुंतवणुकीवर वार्षिक १५ टक्के व्याज मिळावे.
7 / 10
कोट्यधीश होण्याचे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी, तुम्हाला वयाच्या ३० व्या वर्षापासून हे १५x१५x१५ सूत्र वापरणे सुरू करावे लागेल. यासाठी तुम्हाला १५ वर्षांसाठी म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दरमहा १५००० रुपये गुंतवावे लागतील. जर आपण एसआयपीचा इतिहास पाहिला तर त्याने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना १५-१८ टक्के परतावा दिला आहे.
8 / 10
आपण गृहीत धरू की तुमच्या १५ वर्षांच्या गुंतवणुकीवर १५ टक्के दराने व्याज मिळते. तर या कालावधीत तुम्ही एकूण २७,००,००० लाख रुपये जमा कराल. यावर तुम्हाला १५% दराने ७४,५२,९४६ रुपये व्याज मिळेल. यानुसार तुमचा एकूण फंड १,०१,५२,९४६ रुपये असेल.
9 / 10
गुंतवणूक जितक्या लवकर सुरू केली, तितका फायदा होईल, असा सल्ला तज्ज्ञ देतात. हे देखील पूर्णपणे खरे आहे. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की जर तुम्ही एसआयपीमध्ये १५ वर्षांसाठी दर महिन्याला १५००० रुपये गुंतवले तर तुम्हाला सुमारे १ कोटी रुपये मिळतील.
10 / 10
तर जर तुम्ही ३० वर्षे तुमची गुंतवणूक चालू ठेवली तर तुमच्याद्वारे जमा केलेली रक्कम ५४ लाख असेल, परंतु त्यावर व्याजाची रक्कम ९,९७,४७,३०९ रुपये असेल आणि अशा प्रकारे तुमचा एकूण फंड १०,५१,४७,३०९ रुपये होईल. (टीप- म्युच्युअल फंडात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या बाजारातील तज्ञांचा सल्ला घ्या)