शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जागतिक संकटांमुळे सोन्यातील गुंतवणूक यंदा फायदेशीर ठरणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:26 AM

1 / 8
नवी दिल्ली : शेअर बाजारातील घसरण आणि बँकिंग क्षेत्रातील संकट यामुळे यंदा गुंतवणुकीसाठी सोने हा चांगला पर्याय राहील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सूत्रांनी सांगितले की, शेअर बाजारातील कल आणि सराफा बाजार हे एकमेकांच्या विरोधात चालत असतात.
2 / 8
म्हणजेच शेअर बाजार जेव्हा वाढतो, तेव्हा सोने घसरते आणि शेअर बाजार घसरतो, तेव्हा सोने वाढते. २०२३ च्या पहिल्या ३ महिन्यांतील कल शेअर बाजारासाठी घसरगुंडीचा राहिला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव वाढत आहे. हाच कल पुढे कायम राहू शकतो.
3 / 8
सोन्यातील गुंतवणूक वाढण्यास कारणीभूत ठरणारा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, जागतिक पातळीवरील संकट. २०२० पासून सातत्याने काही ना काही संकट जागतिक पातळीवर राहत आले आहे.
4 / 8
उदा. रशिया-युक्रेन युद्ध, सातत्याने वाढणारे व्याजदर आणि वाढती महागाई ही संकटे मागील ३ वर्षांत राहिली. यंदा बँकिंग क्षेत्रातील संकट घोंघावत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढून भाव चढे राहू शकतात.
5 / 8
सूत्रांनी सांगितले की, २०२० मध्ये सोने प्रति १० ग्रॅम ४८ हजार रुपये होते. २०२१ मध्ये ते ४९ हजार रुपये, तर २०२२ मध्ये ५२ हजार रुपये झाले. यंदा ते ५८ हजारांच्या पुढे गेले आहे. म्हणजेच, संकट काळात सोन्यात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली आहे.
6 / 8
२००८ मध्ये लेहमन ब्रदर्सचे पतन झाले तेव्हा सोन्याचे दर ३० टक्क्यांनी वाढले होते. २००८ मध्ये सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १२,५०० रुपये होता. २००९ मध्ये तो १५ हजार रुपये झाला. २०१८ मध्ये तो थेट ३२ हजार रुपये झाला.
7 / 8
मागील २५ वर्षांपासून सोने चक्रवाढ पद्धतीने सरासरी ११% परतावा देत आहे. जेव्हा सोन्याचे दर घसरतात, तेव्हा दीर्घ कालावधीसाठी ती खरेदीची संधी असते. गेल्या ५ वर्षांत सोन्याचा दरात दुप्पट वाढ झाली आहे.
8 / 8
अमेरिकी फेडरल रिझर्व्ह व्याजदर नरम ठेवील, असा अंदाज आहे. याचा सोन्याला लाभ होऊ शकतो. महागाई स्थिर असेल, तोपर्यंत पतधोरण लवचिक राहील. त्यामुळे सोन्याच्या भावात चढ-उतार होऊ शकतो, असे कमोडिटी विश्लेषक नृपेंद्र यादव यांनी सांगितले.
टॅग्स :Goldसोनंbusinessव्यवसाय