शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment : नव्या वर्षात या चार सेक्टरमधील गुंतवणूक ठरू शकते फायदेशीर, मिळेल पैसाच पैसा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:19 PM

1 / 5
सन २०२३ हे शेअर मार्केटच्या दृष्टीने कसं असेल याचा अंदाज गुंतवणूकदारांकडून घेतला जात आहे. नव्या वर्षामध्ये काही विशेष सेक्टर्सवर लक्ष ठेवून आपल्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. २०२३ मध्ये कुठल्या चार क्षेत्रांवर लक्ष ठेवता येईल ते जाणून घेऊयात.
2 / 5
आरोग्याबाबत लोक अलर्ट होत आहेत. तसेच आपल्या आरोग्याबाबत खूप काळजी घेत आहे. तर वाढत्या आजारांमुळेसुद्धा रुग्णांची संख्या खूप वाढत जात आहे. अशा परिस्थितीत आरोग्याशी संबंधित कंपन्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये नफ्याची अपेक्षा आहे. ज्याबाबत हेल्थकेअरशी संबंधित कंपन्यांमध्ये नव्या वर्षात वाढ दिसू शकते.
3 / 5
गेल्या काही काळात एफएमसीजी प्रॉडक्टची मागणी खूप वाढत आहे. फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स सेक्टर भारतातील चौथं सर्वात मोठं सेक्टर आहे. तसेच वाढती लोकसंख्या आणि ग्राहकांमध्ये वाढत्या ब्रँडच्या जागरुकतेमुळे अनेक वर्षांपासून एका चांगल्या दराने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत एफएमजी सेक्टरशी संबंधित कंपन्यांवर नजर ठेवली जाऊ शकते.
4 / 5
शेती क्षेत्र देशातील जीडीपीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सन २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारसुद्धा कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू शकते. तसेच त्यासाठई काही महत्त्वाच्या घोषणाही होऊ शकतात. अशा परिस्थितीत या क्षेत्रात ग्रोथ दिसून येऊ शकते.
5 / 5
बँकिंग क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये गेल्या खूप काळापासून वाःढ दिसून येत आहे. तसेच अनेक मोठ्या बँका सातत्याने नफा कमावत आहेत. तर बहुतांश बँकांचे बुक्स क्लीन आहे. अशा परिस्थितीत नव्या वर्षामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक चांगला पर्याय ठरू शकते. (सूचना - कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. लोकमत कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही)
टॅग्स :Stock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकagricultureशेतीBanking Sectorबँकिंग क्षेत्र