शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Loss : LIC चा ‘जोर का झटका’, वर्षभरात गुंतवणूकदारांचे बुडाले २५०००० कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 1:44 PM

1 / 9
सरकारी विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं आपल्या गुंतवणूकदारांना मोठा झटका दिलाय. एलआयसीचे शेअर्स एका वर्षापूर्वी १७ मे रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले होते.
2 / 9
या शेअर्सची इश्यू प्राईज ९४९ रुपये होती. सध्या या शेअरची किंमत आपल्या इश्यू प्राईजपेक्षा ४० टक्क्यांनी घसरली आहे. एलआयसीचं मार्केट कॅप २.५ लाख कोटी रूपयांपर्यंत कमी झालंय.
3 / 9
याचाच अर्थ एलआयसीच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना २.५ लाख कोटी रुपयांचा मोठा झटका लागलाय. एलआयसीचे शेअर्स १७ मे रोजी कामकाजादरम्यान ५६८.९० रुपयांवर ट्रेड करत होते.
4 / 9
एलआयसीमध्ये सरकारचा हिस्सा ९६.५ टक्के आहे. लिस्टिंगनंतर स्टॉकचं फ्री फ्लोट अतिशय कमी आहे आणि कदाचित यामुळेत मार्केट व्हॅल्यूत प्रमुख १५ कंपन्यांमध्ये असून त्यांना निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये जागा निर्माण करता आलेली नाही.
5 / 9
इकॉनॉमिक टाईम्सच्या एका रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आलीये. यावर्षी आतापर्यंत एलआयसीच्या शेअर्समध्ये जवळपास २० टक्क्यांपर्यंतची घसरण झालीये. तर गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये १२ टक्क्यांची घसरण झालीये.
6 / 9
गेल्या एका वर्षात एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठा झटका लागण्यासोबतच म्युच्युअल फंड्स आणि फॉरेन इन्स्टीट्युशनल इनव्हेस्टर्स दोघांनीबी कंपनीतील आपला हिस्सा कमी केलाय. एलआयसीमध्ये म्युच्युअल फंड्सचा हिस्सा ०.६३ टक्के राहिलाय.
7 / 9
डिसेंबर २०२२ तिमाहित तो ०.६६ टक्के होता. जून २०२२ तिमाहिमध्ये एफआयआय चा एलआयसीतील हिस्सा ०.७४ टक्के होता. तर आता त्यांचा हिस्सा ०.०८ टक्के राहिलाय. डिसेंबर २०२२ तिमाहित एफआयआयचा हिस्सा ०.१७ टक्के होता.
8 / 9
परंतु दुसरीकडे रिटेल इन्व्हेस्टर्सनं या घसरणीदरम्यान यात गुंतवणूक वाढवली आहे. एलआयसीमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्सची गुंतवणूक २.०४ टक्क्यांवर पोहोचली. डिसेंबक २०२२ मध्ये ती १.९२ टक्क्यांवर होती.
9 / 9
यात रिटेल इव्हेस्टर्सची गुंतवणूक जरी वाढली असली तरी एकूण गुंतवणूकदारांच्या संख्येत घट झाली आहे. आयपीओच्या दरम्यान, एलआयसीमध्ये ३९.८९ लाख रिटेल इन्व्हेस्टर्स होते, जे मार्च तिमाहित कमी होऊन ३३ लाखांवर आले. एका वर्षात ६.८७ लाख गुंतवणूकदार बाहेर गेले.
टॅग्स :LIC - Life Insurance CorporationएलआयसीInvestmentगुंतवणूकMONEYपैसा