शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पैशातून पैसे बनवण्याचा 'Magical Formula'; वयाच्या ४० वर्षी बनू शकाल कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:30 PM

1 / 10
कोट्यधीश बनणं काही रॉकेट सायन्स नाही. ही केवळ मनी मॅनेजमेंटची गोष्ट आहे. जी प्रत्येकजण समजू शकत नाही. त्यासाठी खर्च, बचत आणि गुंतवणूक यामध्ये ताळमेळ ठेवत थोडेसे पेशन्स आणि शिस्त ठेवणे गरजेचे असते.
2 / 10
जर तुमच्यात पैशाचं नियोजन करण्याची क्षमता असेल तर पुढील काही वर्षातच तुम्ही स्वत: कोट्यधीश बनाल. असे बरेच फॉर्म्युले आहेत ज्यामुळे केवळ १५ वर्षात तुमची कोट्यधीश बनण्याची क्षमता होते. जर वयाच्या २५ व्या वर्षी तुम्ही हा फॉर्म्युला वापरत असाल तर ४० व्या वर्षी कोट्यधीश होऊ शकता.
3 / 10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम गुंतवणुकीकडे वळवली पाहिजे. ही गुंतवणूक अशा ठिकाणी करायला हवी जिथं तुम्हाला वेळेसोबतच मोठ्या प्रमाणात रिटर्न मिळेल.
4 / 10
या गुंतवणुकीसाठी तुमच्याकडे मॅच्युअल फंडाचा ऑप्शन चांगला आहे. तुम्हाला SIP च्या माध्यमातून १५*१५*१५ हा फॉर्म्युला वापरून केवळ १५ वर्षातच कोट्यधीश बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकाल. मार्केट लिंक्ड असल्याने SIP मध्ये गॅरंटेड रिटर्न मिळत नाही.
5 / 10
मॅच्युअल फंडातील रिटर्न हे मार्केट बेस्ड असते, परंतु दिर्घकाळ गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही जे रिटर्न मिळवाल ते कुठल्याही सरकारी योजनेत शक्य नाही. दिर्घकाळ गुंतवणूक करून सरासरी वर्षाला १२ टक्के रिटर्न ग्राह्य धरले जातात.
6 / 10
SIP च्या माध्यमातून मॅच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास अनेकदा वर्षाला १५ टक्क्याहून अधिक रिटर्न मिळू शकते. SIP मध्ये कपाऊंडिंगचा फायदा मिळतो आणि त्यातून वेल्थ क्रिएशन खूप वेगाने होत असते.
7 / 10
१५*१५*१५ नुसार, तुम्हाला दर महिन्याला १५ वर्षासाठी काही ठराविक रक्कम गुंतवणूक करावी लागते. ज्यात १५ टक्के व्याजदारानुसार रिटर्न मिळू शकते. सध्या इतके रिटर्न SIP मधूनच शक्य आहे. १५ हजार महिन्याला गुंतवणूक केल्यास १५ वर्षात २७ लाख रुपये गुंतवणूक होते.
8 / 10
जर त्यावर १५ टक्के व्याज मिळाले तर ती रक्कम ७४ लाख ५२ हजार इतकी होते. याप्रकारे गुंतवणूक केलेली रक्कम आणि व्याज मिळून १ कोटी १ लाख ५२ हजार फंड तयार होता. जर १२ टक्के व्याज पकडले तर २ वर्षाचा कालावधी वाढेल. म्हणजे १७ वर्षांनी तुम्ही कोट्यधीश बनू शकता.
9 / 10
गुंतवणूक ही लवकरात लवकर सुरू करावी जेणेकरून कोट्यधीश बनू शकता. परंतु त्यासाठी तुमच्या पगारातून घरखर्च आणि इतर खर्च वजा करून शिल्लक रक्कम १५ हजार हवी. आर्थिक नियमामुळे माणसाने उत्पन्नाच्या २० टक्के गुंतवणूक केली पाहिजे.
10 / 10
जर तुम्ही ३० वर्षे तुमची गुंतवणूक चालू ठेवली तर तुमच्याद्वारे जमा केलेली रक्कम ५४ लाख असेल, परंतु त्यावर व्याजाची रक्कम ९,९७,४७,३०९ रुपये असेल आणि अशा प्रकारे तुमचा एकूण फंड १०,५१,४७,३०९ रुपये होईल. (टीप- म्युच्युअल फंडात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या बाजारातील तज्ञांचा सल्ला घ्या)
टॅग्स :Investmentगुंतवणूक