शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इन्व्हेस्टमेंट सही है! १० कोटींची संपत्ती बनवण्यासाठी किती वर्ष गुंतवणूक करावी लागेल, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 7:12 PM

1 / 13
लोकांच्या मनात एक गैरसमज आहे की जर तुम्हाला चांगली संपत्ती बनवायची असेल तर तुम्हाला मोठ्या रकमेपासून सुरुवात करावी लागेल. मात्र हे खरं नाही. या समजामुळे, बरेच लोक गुंतवणूक सुरू करण्यासाठी प्रतीक्षा करत असतात. बँकेत मोठी रक्कम जमा करण्याऐवजी किंवा जास्त रकमेची पारंपारिक जीवन विमा योजना खरेदी करण्याऐवजी, तुम्हाला फक्त तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
2 / 13
दीर्घकाळात प्रचंड संपत्ती निर्माण करण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे. प्रथम, लवकर गुंतवणूक सुरू करा. दुसरे, गुंतवणुकीत शिस्त ठेवा. तिसरे, तुमच्या गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी वाढवत राहा. विशेषत: जेव्हा उत्पन्न वाढते तेव्हा गुंतवणुकीचे प्रमाण वाढवा.
3 / 13
जर तुम्ही ही रणनीती अवलंबली तर तुमची प्रचंड संपत्ती निर्माण करण्यासाठी मोठ्या रकमेची गुंतवणूक सुरू करण्याची गरज भासणार नाही. तसेच तुम्हाला सर्वाधिक परतावा असलेल्या गुंतवणूक पर्यायाच्या मागे धावण्याची गरज नाही. आपल्याला फक्त वेळ आणि शिस्त हवी आहे.
4 / 13
लवकर गुंतवणूक सुरू करणे, शिस्त राखणे आणि दरवर्षी तुमची गुंतवणूक वाढवणे या धोरणाचे फायदे स्पष्ट करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारत आहोत. या रणनीतीसह १० कोटी रुपयांची संपत्ती तयार करण्यासाठी तुम्हाला किती वर्षे गुंतवणूक करावी लागेल?
5 / 13
चला उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. असे गृहीत धरू की तुम्ही एसआयपीमध्ये २५ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास सुरुवात करता. आम्ही रिटर्नच्या तीन स्थितींना घेऊन पुढे जाऊ. प्रथम, ८ टक्के वार्षिक परतावा, दुसरा १० टक्के वार्षिक परतावा आणि तिसरा १२ टक्के वार्षिक परतावा. ज्या गुंतवणूकदारांना जास्त जोखीम घ्यायची नाही ते विचारपूर्वक गुंतवणूक करू इच्छितात जेणेकरून त्यांचा वार्षिक परतावा ८ टक्क्यांपेक्षा जास्त नसेल.
6 / 13
दरवर्षी एसआयपीची रक्कम वाढवून, तुम्ही संपत्तीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी लागणारा वेळ कमी करू शकता. आपण १० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे, ते साध्य करण्यासाठी लागणारा कालावधी ६ ते १३ वर्षांनी कमी करता येऊ शकतो.
7 / 13
काही गुंतवणूकदार अधिक जोखीम घेण्यास तयार असू शकतात. ते शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. अशा गुंतवणूकदारांसाठी, १२ टक्के वार्षिक परताव्याचा अंदाज लावला आहे. परताव्याचा हा फॉर्म्युला दरवर्षी SIP मध्ये वाढ झाल्यास सुद्धा लागू होतो, म्हणजे स्टेप-अप SIP. यामध्ये तुम्ही दरवर्षी गुंतवणुकीची रक्कम टक्क्यांनी वाढवत रहा. पहिल्या वर्षी तुम्ही एसआयपीमध्ये २५,००० रुपयांची गुंतवणूक सुरू करता. दुसऱ्या वर्षी ही रक्कम वाढून २७,५०० रुपये होते. एसआयपीच्या संपूर्ण कार्यकाळात ही रक्कम दरवर्षी सारखीच वाढते.
8 / 13
यामध्ये समोर येणारी पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मोठ्या रकमेची गुंतवणूक सुरू करण्याची गरज नाही. जर तुम्हाला थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुम्हाला वेळ थोडा वाढवावा लागेल. तुम्ही दर महिन्याला जितकी जास्त गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही तुमची आर्थिक उद्दिष्टे साध्य कराल. त्याचप्रमाणे, तुमचा दृष्टीकोन जितका कंजर्व्हेटिव्ह असेल तितका तुमचा गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागेल.
9 / 13
एसआयपीची रक्कम वाढवल्याने गुंतवणुकीचे उद्दिष्ट लवकर गाठण्यात मदत होते. १० कोटी रुपयांचे संपत्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी लागणारा वेळ आपण ६ ते १३ वर्षांपर्यंत कमी करू शकतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही एसआयपीची रक्कम दरवर्षी २० टक्क्यांनी वाढवली, तर तुम्हाला वार्षिक १२ टक्के रिटर्नसह तुमचे संपत्तीचे लक्ष्य गाठण्यासाठी २५ वर्षांच्या ऐवजी १९ वर्षे लागतील.
10 / 13
जेव्हा तुम्ही कंपाउंडिंगचा प्रभाव पाहता तेव्हा तुमच्याकडे मोठी क्षमता असते. हे खूप सोपे दिसत असले तरी गुंतवणुकीत शिस्त राखणे कुणासाठीही सोपे नाही. जर तुम्हाला थोड्या रकमेतून गुंतवणूक सुरू करायची असेल तर तुमच्यासाठी एक गोष्ट उपयुक्त ठरेल ती म्हणजे लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करणे. पण, वय कमी असताना लोक गुंतवणुकीपेक्षा खर्च करण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात.
11 / 13
व्हीआर वेल्थ ॲडव्हायझर्सचे संस्थापक विवेक रेगे म्हणतात, “जोखीम घेण्याच्या क्षमतेसोबतच संयम राखणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा या गोष्टी घडतात तेव्हा गुंतवणूक करणे सोपे होते. तुम्ही शेअर्समध्ये अधिक गुंतवणूक करण्यास तयार असाल पण शेअर्समध्ये ४०-५० टक्क्यांची घसरण आल्यानंतर तुम्हाला तुमची गुंतवणूक चालू ठेवणे कठीण होऊ शकते. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा उलट नजरेस येते.”
12 / 13
पोर्टफोलिओ बदलणे किंवा अचानक रणनीती बदलणे तुमच्यासाठी धोका वाढवते. यामुळे जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा आपले नुकसान झाले असे वाटते. म्हणूनच तुम्ही साध्या उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह धरला पाहिजे.
13 / 13
झटपट आणि उच्च परतावा मिळवण्याऐवजी, तुम्ही नियमित परतावा मिळवण्यावर भर द्यावा. जास्त परतावा मिळवण्याच्या लोभापोटी अनेक वेळा गुंतवणूकदार जास्त जोखीम पत्करू लागतात. हे दुधारी तलवारीवरीसारखे आहे. (टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाshare marketशेअर बाजार