PNB MySalary Account : आता खातेधारकांना मिळणार २० लाखांपर्यंतचा विमा, गृहकर्जावरही सूट By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 2:16 PM
1 / 20 गेल्या काही दिवसांपासून अनेक बँका आपल्या ग्राहकांसाठी गृहकर्जावरील व्याजात सूट देत आहेत. परंतु आता नोकरी करणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. 2 / 20 जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमचं सॅलरी अकाऊंटही नक्कीच असेल. सॅलरी अकाऊंटसह बँक अनेक सुविधा देत असते. 3 / 20 परंतु आता सॅलरी अकाऊंट असलेल्या ग्राहकांना पंजाब नॅशनल बँकेनं काही खास सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 4 / 20 बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार PNB बँकेत सॅलरी अकाऊंट सुरू केल्यावर पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्ससह कंपनी ओव्हरड्राफ्ट आणि स्वीपचीही सुविधा देत आहे. 5 / 20 बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार PNB MySalary Account च्या ग्राहकांसाठी ३ लाख रूपयांपर्यंत ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि त्यासोबतच २ लाख रूपयांपर्यंत अॅक्सिडेंटल कव्हरही देण्यात येणार आहे. 6 / 20 याशिवाय ग्राहकांना लोनवर डॉक्युमेंटेशन आणि प्रोसेसिंग फीमध्ये १०० टक्के सूटही मिळू शकते. 7 / 20 बँकेनं या अंतर्गत खातं सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सिल्वर, गोल्ड, प्रिमिअम आणि प्लॅटिनम या श्रेणींमध्ये विभागलं आहे. 8 / 20 पीएनबीच्या या खास सुविधेअंतर्गत केंद्र, राज्य सरकार, पीएसयू, शासकीय-निमशासकीय, एनएनसीज, मोठ्या संस्था, कॉर्पोरेट अथवा शिक्षण संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना हे खातं सुरू करता येईल. 9 / 20 सॅलरी अकाऊंटमध्ये कोणत्याही प्रकारची किमान रक्कम ठेवणं बंधनकारक नाही. तसंच हे खातं शून्य बॅलन्समध्येही सुरू करता येऊ शकतं. 10 / 20 बँकेनं सुरू केलेल्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही कॅलेंडर तिमाहीमध्ये सलग तीन महिने खात्यात वेतन येणं आवश्यक आहे. 11 / 20 ज्यांचं वेतन १ ते २५ हजार रूपयांच्यामध्ये आहे त्यांना सिल्वर श्रेणीचं खातं देण्यात येईल. 12 / 20 तर ज्यांचं वेतव २५ हजार रूपये ते ७५ हजारांच्या दरम्यान असेल त्यांना गोल्ड श्रेणीचं खातं देण्यात येईल. 13 / 20 ७५ हजारांपासून १.५ लाखांपर्यंत मासिक वेतन असेल्यांना प्रिमिअम तर १.५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक वेतन असलेल्यांना प्लॅटिनम श्रेणीतील खातं देण्यात येईल. 14 / 20 सिल्व्हर श्रेणीमध्ये ५० हजार, गोल्ड श्रेणीत १.५ लाख तक प्रिमिअम आणि प्लॅटिनम श्रेणीत अनुक्रमे २.२५ लाख ते ३ लाखांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात येणार आहे. 15 / 20 बँक १८ लाख रूपयांचा इन्शुरन्स कव्हर उपलब्ध करून देणार आहे. तसंच २ लाख रूपयांचा इन्शुरन्स कव्हर डेबिट कार्ड वापरण्यावर मिळेल. 16 / 20 सर्वच श्रेणीच्या खात्यांवर २० लाख रूपयांचा पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर मिळणार आहे. 17 / 20 सिल्व्हर श्रेणीच्या कार्डासाठी रुपे क्लासिक, प्लॅटिनम कार्ड देण्यात येईल. तसंच यासाठी काही शुल्कही आकारलं जाईल. परंतु अन्य श्रेणीतील कार्डसाठी कोणत्याही प्रकारे शुल्क आकारलं जाणार नाही. 18 / 20 सिल्व्हर श्रेणी आणि गोल्ड श्रेणीतील खातेधारकांना गृह, कार किंवा पर्सनल लोन डॉक्युमेंटशन आणि प्रोसेसिंग चार्जमध्ये ५० टक्के सूट दिली जाईल. 19 / 20 तसंच प्रिमिअम आणि प्लॅटिनम श्रेणीतील खातेधारकांना १०० टक्के सूट मिळेल. पण यासाठी सलग तीन महिने खात्यात वेतनं येणं अनिवार्य आहे. 20 / 20 याव्यतिरिक्त जर ग्राहकांना क्रेडिट कार्ड हवं असेल तर त्यांना ते देण्यात येईल. क्रेडिट कार्ड इश्यूसाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परंतु ग्राहकांना वार्षिक शुल्क मात्र द्यावं लागेल. आणखी वाचा