शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Tips : तरुणांनो, गुंतवणूक सुरू केली का? जाणून घ्या गुंतवणूकीच्या टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 10:49 AM

1 / 5
वयाच्या १८ व्या वर्षी प्रत्येक तरुणाला काही अनेक विशेषाधिकार मिळतात. वयाच्या या टप्प्यावर तुम्ही पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, क्रेडिट किंवा डेबिट कार्डसह जीवनाशी संबंधित सर्व निर्णय घेण्यास सक्षम होता. मग तुम्ही यावेळी आर्थिक नियोजनाला का सुरुवात करत नाही?. लक्षात ठेवा, जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक करण्यास सुरुवात कराल तितके भविष्यात तुमचे चांगले होईल.
2 / 5
किती पैसे मिळतील? वयाच्या १८व्या वर्षापासून नियमितपणे महिन्याला ३ हजार म्युच्युअल फंड एसआयपी गुंतवणूक केल्यास, ३० वर्षांनंतर अंदाजे १२% वार्षिक व्याजदराने, तुम्ही परतावा म्हणून १ कोटी ५ लाख रुपये जमा करू शकता. सध्याच्या महागाईत ३ हजार ही रक्कम अधिक नाही.
3 / 5
इतकी माेठी रक्कम उभी राहते तरी कशी? जर तुम्ही ५ वर्षांनी तीच गुंतवणूक करायला सुरुवात केली तर २५ वर्षांनंतर त्याच वार्षिक व्याजदराने तुम्हाला सुमारे ५६.३७ लाख रुपयांचा परतावा मिळू शकेल. वास्तविक हे चक्रवाढमुळे शक्य आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास विलंब होता कामा नये.
4 / 5
कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी? जर तुम्हाला या वयात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडायचा असेल, तर म्युच्युअल फंडातील एसआयपी, स्मॉल तिकिट साइज वेल्थ आणि ब्लू चिप स्टॉक्स तुमच्यासाठी अधिक चांगले असू शकतात. तिघेही ३-५ वर्षांत चांगला परतावा देतात. बाजारातील अस्थिरता आणि दीर्घ कालावधीसह वाजवी परतावा देणाऱ्या योजनांपेक्षा या तिन्हींवर चक्रवाढ केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळतो.
5 / 5
गुंतवणूक कशी सुरू करावी? तरुण गुंतवणूकदारांनी नेहमी दीर्घकालीन परतावा असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करावी. वास्तविक, वयाच्या या टप्प्यावर बाजारातील जोखीम आणि त्यातून सावरण्याची क्षमता जास्त असते. इक्विटी मार्केट समजून घेण्यासाठी तुम्ही छोट्या रकमेची गुंतवणूक करून सुरुवात करू शकता. आणि तुम्ही तुमची स्वतःची खास गुंतवणूक प्रोफाइल तयार करू शकता. ५ ते ६ वर्षांत तुम्हाला इक्विटी मार्केटची चांगली माहिती झाल्यास तुम्ही त्यात तुमची अधिक बचत गुंतवू शकता.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसाshare marketशेअर बाजार