शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 9:01 AM

1 / 7
Investment Tips : आजकाल अनेकांना गुंतवणूकीचं महत्त्व समजू लागलंय. त्यामुळेच भविष्याच्या दृष्टीनं अनेक जण गुंतवणूकीकडे वळू लागलेत. पण भविष्यात जर मोठी रक्कम हवी तर योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. हल्ली बहुतांश लोक गुंतवणूकीच्या पारंपारिक पद्धतीऐवजी जोखीम जरी अधिक असली तरी शेअर बाजारातील गुंतवणूकीकडे वळू लागलेत.
2 / 7
तुम्ही भविष्याच कोट्यवधी रुपयांचा फंड जमा करु शकता. १० कोटी रुपयांचा रिटायरमेंट फंड तयार करणं हे स्वप्न नसून प्रत्यक्षात तुम्ही तो जमवू शकता. विशेषत: जर तुम्ही लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर हे शक्य आहे. एका रिपोर्टनुसार, वयाच्या २५ व्या वर्षापासून दरमहा १०,००० रुपयांची एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) करून तुम्ही निवृत्तीपर्यंत १० कोटी रुपये जमा करू शकता.
3 / 7
जर तुमचा वार्षिक परतावा १२% असेल तर ४१ वर्षात म्हणजेच वयाच्या ६६ व्या वर्षी तुमचा फंड १० कोटी रुपयांच्या पुढे जाईल, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या काळात तुमची एकूण गुंतवणूक ४९,२०,००० रुपये असेल. तुमच्या नफ्याची रक्कम १०,४८,९०,०६० रुपये असेल.
4 / 7
ही वेगळी गोष्ट आहे की जर तुमचा परतावा वार्षिक १३% असेल तर तुम्हाला १० कोटी रुपये जमा करण्यासाठी ३८ वर्षे लागतील. म्हणजेच वयाच्या ६३ व्या वर्षी तुम्ही निवृत्तीसाठी तयार व्हाल. या प्रकरणात तुमची एकूण गुंतवणूक ४५,६०,००० रुपये असेल. यामध्ये तुम्हाला ९,७०,७४,५४१ रुपयांचा नफा मिळणार आहे.
5 / 7
जर तुमचा परतावा वार्षिक १४% असेल तर वयाच्या ६१ व्या वर्षी तुम्ही १० कोटी रुपये जोडू शकता. याचा अर्थ असा की या प्रकरणात तुम्हाला फक्त ३६ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. या काळात तुम्ही ४३,२०,००० रुपयांची गुंतवणूक कराल आणि तुम्हाला ९,७७,४०,७९५ रुपयांचा नफा मिळेल.
6 / 7
जर तुमचा परतावा वार्षिक १५% असेल, तर कल्पना करा काय होईल? मग वयाच्या ५९ व्या वर्षी तुम्ही १० कोटी रुपये जमा करू शकता. म्हणजेच तुमचे स्वप्न अवघ्या ३४ वर्षात पूर्ण होईल. या प्रकरणात तुमची एकूण गुंतवणूक ४०,८०,००० रुपये असेल. तुमचा नफा ९,५०,६६,८६८ रुपये होईल. लवकर गुंतवणूक केल्यास कंपाउंडिंगचा फायदा मिळतो, हे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे तुमचे पैसे वेगाने वाढतात.
7 / 7
गुंतवणुकीला लवकर सुरुवात करणं किती गरजेचं आहे, याचाही पुरावा हा अहवाल आहे. तुम्हालाही निवृत्तीनंतर आरामदायी आयुष्य जगायचं असेल तर आजपासूनच गुंतवणुकीला सुरुवात करा. लक्षात ठेवा, उशीरा गुंतवणूक सुरू केल्यास तुम्हाला जास्त पैसे गुंतवावे लागतील आणि नफाही कमी मिळेल. (टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा जाणकारांचा सल्ला नक्की घ्या.)
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMONEYपैसा