शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलांचे भविष्य सुरक्षित करा, चिल्ड्रन्स फंड गुंतवणुकीचा लाभ घ्या; ३ म्युच्युअल फंड फायद्याचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:48 AM

1 / 9
सर्वच पालक आपल्या मुलांचे भविष्य अधिकाधिक चांगले व्हावे, यासाठी प्रयत्नशील असतात. मुलांना भविष्यात चांगले आयुष्य मिळावे, आर्थिकदृष्ट्या मुलांचे भविष्य सुरक्षित असावे, यासाठी पालक विविध योजनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करत असतात.
2 / 9
मुलगा असो की मुलगी, शिक्षणापासून लग्नापर्यंतच्या खर्चासाठी पालक सुरुवातीपासूनच विचार करू लागतात. यासाठी ते आपल्या कमाईतील एक छोटासा भाग बचत करू लागतात. पण बचत करणे किंवा गुंतवणूक अशा साधनांमध्ये किंवा पर्यायांमध्ये करणे चांगले आहे, जिथे परतावा चांगला आहे आणि जोखीम कमी आहे.
3 / 9
मुलांच्या भविष्यासाठी केलेली बचत ही कमी कालावधीची नसते. साधारणपणे लोक ५, १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळासाठी गुंतवणूक करतात. इक्विटी, हा असा एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्यामध्ये जोखीम वेळेनुसार कमी होते.
4 / 9
इक्विटी दीर्घकालीन सर्वोत्तम परतावा देतात, हे देखील ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. दीर्घकालीन परताव्याच्या दृष्टिकोनातून इक्विटी सर्वोत्तम आहेत, असे सल्ला आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ देत असतात. चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना शेअर बाजाराची समज असणे आवश्यक आहे.
5 / 9
इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये चांगल्या ट्रॅक रेकॉर्डसह, कोणत्याही अडचणीशिवाय, दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक केल्यास मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी पुरेसा निधी तयार होऊ शकतो. काही म्युच्युअल फंड कंपन्यांनी विशेषतः मुलांसाठी काही योजना सुरू केल्या आहेत.
6 / 9
HDFC म्युच्युअल फंडाची HDFC चिल्ड्रन्स गिफ्ट फंड - ग्रोथ प्लॅन. एचडीएफसी चिल्ड्रन्स गिफ्ट फंड - ग्रोथ प्लॅन, या फंडाने ६ महिन्यांत १४.१५%, २ वर्षात २१.३६% आणि ५ वर्षात १२.७६% परतावा दिला आहे.
7 / 9
SBI मॅग्नम चिल्ड्रेन्स बेनिफिट फंड या गुंतवणूक योजनेत मुलांच्या भवितव्यासाठी तयार केलेल्या या इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनेने ६ महिन्यांत ७.८४%, १ वर्षात ४.५९% आणि दोन वर्षात ५१.२७% परतावा दिला आहे.
8 / 9
ICICI प्रुडेंशियल चाइल्ड केअर फंड - डायरेक्ट प्लॅनची कामगिरी देखील समाधानकारक राहिली आहे. या फंडाने ६ महिन्यांत ९.५०%, १ वर्षात २.६९% आणि २ वर्षात १७.९५% परतावा दिला आहे. तसेच या फंडाचा ५ वर्षांचा परतावा १०.०९ टक्के राहिला आहे.
9 / 9
जर तुम्हाला मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड कंपन्यांच्या मुलांच्या योजनांची मदत घेऊ शकता. या फंडांनी दीर्घ कालावधीत चांगली कामगिरी केली आहे.
टॅग्स :Investmentगुंतवणूक