शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Tips: फायदाच फायदा; नवीन वर्षात अशा प्रकारे करा तुमच्या पैशांचे नियोजन...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 8:14 PM

1 / 7
New Year Investment Tips : नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि या नवीन वर्षात तुम्ही अनेक संकल्प केले असतील. यामध्ये पैशांची योग्य प्रकारे गुंतवणूक करण्याचा संकल्पही तुम्ही करायला हवा. तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम उभी करायची असेल, तर योग्य प्रकारे गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
2 / 7
या नवीन वर्षात तुम्हाला तुमच्या फायनांन्शिअल टार्गेटची विशेष काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला या वर्षात तुमचा पैसा योग्यप्रकारे मॅनेज करायचा असेल, तर काही इंव्हेंस्टमेट टिप्स ध्यानात घ्याव्या लागतील. यामुळे तुम्हाला कैक पटीने रिटर्न्स मिळू शकतील.
3 / 7
पोर्टफोलिओ तयार करा- बाजारातील चढउतारांपासून तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी विविधीकरण महत्त्वाचे आहे. तुमची गुंतवणूक एखाद्या विशिष्ट मालमत्ता वर्गात केंद्रित असल्यास, तुम्ही तुमचा संपूर्ण पोर्टफोलिओ धोक्यात घालत आहात.
4 / 7
जर त्या बाजार क्षेत्रामध्ये मंदीचे सावट असेल, तर तुमचे नुकसान देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत पोर्टफोलिओमध्ये विविध क्षेत्रातील गुंतवणूक समाविष्ट करा. यामुळे तुमची जोखिम कमी होईल.
5 / 7
दीर्घकालीन गुंतवणूक- सशक्त आर्थिक भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा सर्वात यशस्वी मार्ग म्हणजे तुमच्या बचत आणि गुंतवणुकीचे दीर्घकालीन नियोजन करणे. अशी योजना तयार करा, ज्यात तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळेल.
6 / 7
कर्ज कमी करा- तुम्ही जे काही कर्ज घेतले आहे किंवा बँकांकडून कर्ज घेतले आहे, ते यावर्षी कमी करा किंवा ते पूर्ण करा. मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना कर्जामुळे मोठा फटका बसला आहे. चांगल्या आर्थिक नियोजनासाठी कर्जावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
7 / 7
योग्य बजेट बनवा- तुम्हाला किती रक्कम गुंतवायची आहे आणि तुमचा खर्च किती आहे याचे बजेट बनवा. या बजेटनुसारच पैसे गुंतवा. गुंतवणुकीसाठी योग्य नियोजन केल्यास तुम्हाला नक्की चांगला लाभ मिळू शकतो.
टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसाय