Investment Tips Tax Saving FD or Post Office Time Deposit Where is the highest return see details
Investment Tips: टॅक्स सेव्हिंग FD की पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट, कुठे सर्वाधिक रिटर्न? पाहा डिटेल्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 8:49 AM1 / 7Tax Saving FD: भविष्यासाठी गुंतवणूक ही महत्त्वाची असते. हल्ली भविष्याचा विचार करून अनेक जण गुंतवणुकीकडे वळतात. पारंपारिक गुंतवणूक म्हणून एफडी ही परिचयाचीच आहे. पण अनेक जण गुंतवणूकीसोबतच टॅक्स सेव्हिंगचाही विचार करत असतात.2 / 7टॅक्स सेव्हिंग एफडीकडे अशी लोकं जास्त वळतात ज्यांना टॅक्स वाचवायचा आहे. टॅक्स सेव्हिंग एफडी हा एक आकर्षक पर्याय असला तरी, पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट हे गुंतवणूकदारांना आकर्षित करणारं आणखी एक गुंतवणुकीचं साधन आहे. सरकार दर तिमाहीत स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर अपडेट करते.3 / 7दरम्यान, ५ वर्षांसाठीच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटसह (POTD) सर्व १० अल्प बचत योजनांवरील दर एप्रिल-जून २०२४ तिमाहीसाठी मागील वेळेप्रमाणेच कायम ठेवण्यात आलेले आहेत. सरकारनं यात कोणताही बदल केलेला नाही. आता जर आपण त्यांच्या ५ वर्षांच्या एफजी ठेवींबद्दल म्हटलं, तरच बँका टॅक्स बेनिफिट्स देतात.4 / 7टॅक्स सेव्हिंग एफडी ही एफडीसारखी आहे परंतु ५ वर्षांच्या एफडीवर कर लाभ मिळतो. यामध्ये तुम्ही आयकर कायदा १९६१ च्या कलम 80C अंतर्गत कर वाचवू शकता. यामध्ये तुम्ही कमाल १.५० लाख रुपयांपर्यंतच कर वाचवू शकता. यामध्ये ५ वर्षांचा लॉक-इन पीरिअड आहे. यावर बँका ५.५% ते ७.७५% पर्यंत व्याज देत आहेत. 5 / 7लॉक-इन पीरिअडपूर्वी तुम्ही पैसे काढू शकत नाही. बँक टॅक्स सेव्हिंग डिपॉझिट स्कीमवर वेगवेगळे व्याजदर देत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्व नागरिकांना ६.५०% व्याज दर देत आहे. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक टॅक्स सेव्हिंग एफडीसाठी ७% व्याज दर देत आहेत. डीसीबी बँक टॅक्स सेव्हिंग एफडीवर ७.७५% व्याज देते, तर इंडसइंड बँक ७.२५% ऑफर करते.6 / 7५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (POTD) मध्ये गुंतवणूक केल्यास आयकर कायदा १९६१ च्या कलम 80C अंतर्गत कर लाभ मिळतो. या ठेवी एक, दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठीही करता येतात. 7 / 7यामध्ये, मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढता येतात. परंतु ठेवीच्या दिवसापासून सहा महिन्यांनंतरच तुम्ही पैसे काढू शकता. एप्रिल-जून २०२४ तिमाहीसाठी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटवर 7.5% व्याजदर मिळत आहे. तुम्हाला यामध्ये किमान १००० रुपये गुंतवू शकता, नंतर तुम्हाला १०० च्या पटीत पैसे गुतवावे लागतील. आणखी वाचा Subscribe to Notifications