शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Investment Tips: काय आहे नियम 15*15*15 ? काही वर्षातच व्हाल कोट्यधीश! जाणून घ्या गुंतवणूकीचा गोल्डन रुल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 6:07 PM

1 / 6
Investment Tips: जगातील प्रत्येक व्यक्तीला हवे तसे जगण्यासाठी पैसा कमवायचा आहे. पण काहीजण पैसा कमवतात तर काहीजण फक्त स्वप्नच रंगवत बसतात. तुमच्याही मनात प्रश्न येत असेल की, काही ठराविक लोक कमी वेळेत श्रीमंत कसे होतात. पैसा कमवण्यासाठी मेहनत आणि योग्य गुंतवणूक महत्वाची आहे. गुंतवणूक छोटी असो वा मोठी, योग्य ठिकाणी केल्यास चांगला फंड जमा होऊ शकतो.
2 / 6
आपल्यापैकी अनेकांना वाटत असेल की, दीर्घ मुदतीसाठी प्रचंड पैसा गुंतवला तरच लाखो-कोट्यवधींचा निधी मिळतो, पण तसे नाही. पगारातून किंवा व्यवसायातील उत्पन्नातून दर महिन्याला काही ठराविक रक्कम गुंतवूनही तुम्ही लक्षाधीश होऊ शकता. यासाठी बाजाराच्या जोखमीच्या अधीन असलेल्या म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 15*15*15 नियमाद्वारे तुम्ही लक्षाधीश किंवा कोट्यधीश होऊ शकता.
3 / 6
नियम 15*15*15 म्हणजे काय? म्युच्युअल फंडातील एसआयपी ही एक मोठी गोष्ट आहे. यामध्ये गुंतवणूक एकरकमी नाही तर तुकड्यांमध्ये केली जाते आणि दीर्घ मुदतीत जबरदस्त परतावा मिळतो. म्युच्युअल फंडामध्ये जोखीम आणि काळानुसार अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता.
4 / 6
15*15*15 हा गुंतवणुकीच्या नियोजनासंबंधीचा एक लोकप्रिय नियम आहे, ज्याच्या मदतीने दीर्घ मुदतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी सहज उभारता येतो. यासाठी तुम्हाला जास्त रकमेची गरज नाही. तुम्ही फक्त 15% परतावा देणार्‍या म्युच्युअल फंड योजनेत 15 वर्षांसाठी दरमहा रु 15,000 गुंतवून 1 कोटींचा निधी तयार होऊ शकता.
5 / 6
चक्रवाढ व्याजाने रक्कम वाढेल- म्युच्युअल फंडांमध्ये 'कंपाउंडिंग' हा शब्द खूप वापरला जातो. याच्या मदतीने नियमितपणे गुंतवलेल्या छोट्या रकमा कालांतराने मोठ्या भांडवलात बदलतात. कमावलेल्या व्याजावर तसेच जमा झालेल्या व्याजावर तुमच्या गुंतवणुकीच्या वाढीला मुळात चक्रवाढ व्याज म्हणतात.
6 / 6
असे मानले जाते की म्युच्युअल फंड दीर्घ मुदतीत 15% पर्यंत परतावा देऊ शकतो. नियम 15*15*15 नुसार, जर तुम्ही 15 वर्षांच्या कालावधीसाठी दरमहा रु 15,000 ची गुंतवणूक केली जी वार्षिक आधारावर 15% व्याज देण्यास सक्षम असेल, तर शेवटी तुम्हाला रु. 1,00,27,601 मिळतील. यामध्ये तुम्हची 27 लाख रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि चक्रवाढ व्याजाच्या रुपात मिळणारा परतावा 73 लाख रुपये असेल. तुम्ही हा कालावधी आणखी 15 वर्षे वाढवल्यास तुमची ठेव झपाट्याने वाढेल आणि तुम्हाला १० कोटींहून अधिकची रक्कम मिळू शकते.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन