शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोनं, FD, सेंसेक्‍स की लिक्विड फंड...; यांपैकी कोण बनवतंय मालामाल? कुठे मिळतो सर्वाधिक परतावा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 2:16 PM

1 / 8
आपण नोकरी आणि व्यवसायाबरोबरच आपल्या बचतीचीही योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक असते. जर आपण आपल्या बचतीची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर बंपर परतावा मिळणेही निश्चित आहे. लोक विविध प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असता.
2 / 8
काही लोक सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात, काही लोक बँक एफडीमध्ये पैसे जमा करतात. तर काही लोकांना लिक्विड फंडात गुंतवणूक करणे पसंत करतात. मात्र या सर्वांपैकी कोणत्या फंडातून चांगला परतावा मिळतो. यानुसारच गुंतवणूकदारांनी त्यांचा पोर्टफोलिओ तयार करायला हवा.
3 / 8
आज आम्ही आपल्याला, सोनं (Gold), एफडी (FD), इक्विटी (Sensex) आणि लिक्विड फंड्स (Liquid Fund) यांत गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या 10 वर्षांत किती परतावा मिळाला यासंदर्भात माहिती देत आहोत. यामुळे आपल्यालाही गुंतवणुकीसंदर्भात काही मदत होऊ शकते.
4 / 8
महत्वाचे म्हणजे, इनव्हेस्‍टमेंट रिटर्न्‍सचा हा डेटा 20 मार्च 2023 पर्यंतचा आहे. येथील सोन्यावरील परतावा देशांतर्गत किंमतींवर आधारीत आहे. कॅश अर्थात लिक्विड फंड्स कॅटॅगिरीसाठी अॅव्हरेज परतावा घेण्यात आला आहे. तसेच, फिक्स्ड डिपॉझिटसाठी SBI च्या डिपॉझिट्सचा आधार घेण्यात आला आहे. इक्विटीचा अर्थ बेंचमार्क सेंसेक्‍स रिटर्न असा आहे.
5 / 8
एक वर्षाच्या गुंतवणुकीवर परतावा - मिंटच्या अहवालानुसार, गेल्या एक वर्षात सोन्याने सर्वाधिक म्हणजेच 11.39 टक्के एवढा परतावा दिला आहे. लिक्विड फंडने 5.36 टक्के, एफडीने 5.1 टक्के तर इक्विटीने 0.41 टक्के परतावा दिला आहे.
6 / 8
3 वर्षांच्या गुंतवणुकीवरील परतावा - जर तीन वर्षांच्या गुंतवणुकीसंदर्भात बोलायचे झाल्यास, इक्विटी (सेंसेक्स)ने 24.43 टक्के एकवढा सर्वाधिक परतावा दिला आहे. सोन्याने 12.85 टक्के, एफडीने 5.7 टक्के आणि लिक्विड फंडाने 4.05 टक्के एवढा परतावा दिला आहे.
7 / 8
5 वर्षांच्या गुंतवणुकीवरील परतवा - गेल्या पाच वर्षांतील गुंतवणुकीवर सोन्याने 12.85 टक्के एवढा सर्वाधिक परतावा दिला आहे. यानंतर इक्विटीमध्ये 11.8 टक्के, एफडीवर 6.4 टक्के, लिक्विड फंड्सने 5.09 टक्के परतावा दिला आहे.
8 / 8
10 वर्षांतील गुंतवणुकीवरील परतावा - गेल्या 10 वर्षांत इक्विटी (सेंसेक्स) मध्ये 11.8 टक्के एवढा सर्वाधिक परतावा मिळाला आहे. एफडीने 8.75 टक्के एवढा परतावा दिला आहे. लिक्विड फंड्सने 6.56 टक्के तर तसेच एफडीवर 8.75 टक्के एवढा परतावा मिळाला आहे.
टॅग्स :InvestmentगुंतवणूकGoldसोनंshare marketशेअर बाजारbankबँकMONEYपैसा