शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या ₹3 च्या स्टॉकवर गुंतवणूकदारांच्या उड्या! LIC कडे तब्बल 97 लाख शेअर, कंपनीने घेतलाय मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 5:39 PM

1 / 7
इंटीग्रा एसेंशिया हा दलाल स्ट्रीटवर सूचीबद्ध असलेल्या पेनी स्टॉक्सपैकी एक आहे. भारतीय विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात LIC ची या पेनी स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक आहे.
2 / 7
या कंपनीच्या शेअरला सोमवारी 5% चे अप्पर सर्किट लागले होते आणि हा शेअर इंट्राडे 3.57 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. शेअरमध्ये आलेल्या या तेजीचे कारण म्हणजे, उद्यापासून म्हणजेच ११ जूनपासून कंपनीचा राइट्स इश्यू सुरू होणार आहे.
3 / 7
इंटीग्रा एसेंशिया राइट्स इश्यूचे डिटेल्स - - इंटेग्रा एसेंशिया राइट्स इश्यू प्राइस - कंपनी बोर्डाने इश्यू मूल्य प्रत्येकी ₹3.25 घोषित केले आहे. - इंटेग्रा एसेंशिया राइट्स इश्यूची तारीख - इश्यू 11 जून 2024 ला सुरू होईल आणि 25 जून 2024 ला संपेल.
4 / 7
- इंटेग्रा एसेंशिया राइट्स इश्यूची साइज - आपल्या राइट्सच्या माध्यमाने ₹49.93 कोटी रुपयांचा निधी उभारणे हे कंपनीचे टार्गेट - इंटेग्रा एसेंशिया राइट्स इश्यू रेकॉर्ड डेट - कंपनीने राइट्स इश्यूसाठी रेकॉर्ड डेट 1 जून, 2024 निश्चित केली आहे.
5 / 7
- इंटिग्रा एसेन्शिया राइट्स इश्यू रेशो - राइट्स इश्यू एंटाइटेलमेंट रेशोला रेकॉर्ड डेटवर ठवण्यात आलेल्या प्रत्येक 119 पूर्ण देय इक्विटी शेअर्ससाठी 20 राइट्स इक्विटी शेअर घोषित कण्यात आले आहेत.
6 / 7
राइट्स इश्यू म्हणजे काय? - कंपन्या अतिरिक्त फंड उभारणीसाठी राइट्स इश्यूची घोषणा करतात. कंपन्या राइट्स इश्यूमध्ये शेयरधारकांना वर्तमान ट्रेडिंग प्राइसपेक्षा डिस्काउंटवर नवे शेअर खरेदी करण्याची संधी देतात. कंपन्या शेयरधारकांना सवलतीच्या दरात स्टॉकमध्ये त्यांचे एक्सपोजर वाढवण्याची संधी देतात राइट्स इश्यूमध्ये, मार्केटमध्ये अधिक शेअर्स जारी केले जातात, अशा स्थितीत स्टॉकची किंमत कमी होते आणि ती शक्यतो ती खाली जाते.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार