शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकाच दिवसात गुंतवणूकदार मालामाल; 'या' दोन IPO मध्ये डबल झाला पैसा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 4:36 PM

1 / 10
गुंतवणूकदार काही कंपन्यांच्या आयपीओची डोळे लावून वाट बघत असतात. कारण आयपीओतून पैसा तयार होतो. कंपनीचे पोर्टफोलियो चांगले असेल, तर लिस्टिंग गेनमध्ये गुंतवणूकदार रिटर्न्सने मालामाल होतात. काहीसे असेच सोमवारी शेअर बाजारात लिस्ट झालेल्या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांसोबत झाले आहे.
2 / 10
सोमवारी जी आर इंफ्राप्रोजेक्ट्स आणि स्पेशलिटी केमिकल बनवणारी कंपनी Clean Science ने शेअर बाजारात एन्ट्री केली आहे. या दोन्ही कंपन्यांची दोरदार लिस्टिंग झाली आहे.
3 / 10
ज्या गुंतवणूकदारांना या कंपन्यांच्या आयपीओमध्ये शेअर्स अलॉट झाले असतील, त्यांच्या चेहऱ्यावर आज दबरदस्त आनंद असेल. कारण या दोन्ही कंपन्यांनी लिस्टिंगच्या दिवशीच आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे डबल केले आहेत.
4 / 10
जी आर इंफ्राप्रोजेक्ट्सची लिस्टिंग 105 टक्के प्रिमियमवर झाली. तर Clean Science च्या शेअर्सची लिस्टिंग 98 टक्के प्रीमियमवर झाली.
5 / 10
जी आर इंफ्राप्रोजेक्ट्सचे शेअर्स सोमवारी 837 रुपयांच्या इश्यू मूल्याच्या तुलनेत 105 टक्के प्रिमियमसोबत सूचीबद्ध झाले. जी आर इंफ्राप्रोजेक्ट्सचे शेअर्स बीएसईवर 103.10 टक्क्यांच्या मोठ्या उसळीसह 1,700 रुपयांवर सूचीबद्ध झाले. तर एनएसईवर शेअर 105 टक्के वाढीसह 1,715.85 रुपयांवर सूचीबद्ध झाले.
6 / 10
जी आर इंफ्राप्रोजेक्ट्सचा आयपीओ 102.58 पट सब्सक्राइब झाला होता. त्याचा प्राइस बँड 828 ते 837 रुपये ठेवण्यात आला होता आणि आयपीओ 7 जुलैला ओपन झाला होता. जवळपास सर्वच तज्ज्ञांनी या आयपीओमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता.
7 / 10
तसेच, स्पेशलिटी केमिकल बनवणारी कंपनी Clean Science च्या शेअर्सची लिस्टिंग 98 टक्के प्रिमियमवर झाली होती. कंपनीचे शेअर्स 98 टक्के प्रिमियमसह BSE वर 1784 रुपयांवर लिस्ट झाले आहेत. तर कंपनीची इश्यू प्राइस 900 रुपये होती. तर NSE वर Clean Science ची लिस्टिंग 95 टक्के प्रीमियमसह 1755 रुपयांवर झाली होती.
8 / 10
क्लीन सायन्स अँड टेक्नालॉजीचा आयपीओ या महिन्याच्या सुरुवातीला 93.41 पट सब्सक्राइब झाला होता. स्पेशलिटी केमिकल मॅन्यूफॅक्चरर क्लीन सायन्सचा व्यवसाय जगभरात पसरलेला आहे. याचे ग्राहकही जगभरात आहेत.
9 / 10
महत्वाचे म्हणजे, या दोन्ही कंपन्यांची दमदार लिस्टिंग अशा दिवशी झाली आहे, ज्या दिवशी शेअर बाजार पूर्णपणे दबावात आहे.
10 / 10
सेंसेक्समध्ये 600 अंकांपेक्षाही अधिकची पडझड झाल्याचे दिसत आहे. तर निफ्टीत जवळपास 180 अंकांची घसरण झाली आहे.
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजारMONEYपैसा