शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

iPhone 15 Series Sale Start : आतापासूनच करुन ठेवा बुक, प्रीबुकिंगसाठी फॉलो करा या स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 3:42 PM

1 / 10
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर Apple ने वंडरलस्ट इव्हेंट 2023 च्या माध्यमातून iPhone 15 सीरीज लाँच केली आहे. आता भारतीय वापरकर्ते लवकरच तो खरेदी करू शकतात.
2 / 10
या iPhone सीरिजमध्ये चार मॉडेल्सचा समावेश आहे. iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone Pro Plus. वापरकर्ते हे १५ सप्टेंबरपासून प्री-बुक करू शकतात आणि २२ सप्टेंबरपासून बाजारात खरेदीसाठी उपलब्ध होईल.
3 / 10
आयफोन प्री बुकिंगची प्रक्रिया महत्वाची आहे, यासाठी आम्ही तुम्हाला स्टेप्स सांगणार आहोत.
4 / 10
iPhone 15 Pro सीरीज भारतात 1,34,900 रुपयांना उपलब्ध असेल, या मॉडेलची खास गोष्ट म्हणजे 128GB+256GB+512GB आणि 1TB स्टोरेज उपलब्ध आहे.
5 / 10
iPhone Pro Max ची किंमत 1,59,900 रुपये आहे आणि त्यात 256GB + 512GB आणि 1TB स्टोरेजचा पर्याय आहे.
6 / 10
याशिवाय 128GB, 256GB आणि 512GB सह iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतीय बाजारात 79,000 आणि 89,900 रुपयांना उपलब्ध असतील.
7 / 10
iPhone 15 आणि iPhone 15 Plus मध्ये, वापरकर्त्यांना 48MP कॅमेरासह A16 बायोनिक चिपसेट देखील मिळेल आणि अधिक चांगला बॅटरी बॅकअप देखील मिळेल.
8 / 10
iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max ला एक नवीन टेलीफोटो कॅमेरा मिळेल जो फक्त iPhone Pro Max मध्ये उपलब्ध असेल.
9 / 10
असं करा प्री बुकिंग- आयफोनच्या वेबसाइटवर जा आणि टॉप मेनूवर जा. ड्रॉप-डाउनमधून iPhone 15 किंवा iPhone 15 Pro निवडा. यानंतर, आयफोनच्या किंमती पहा आणि नंतर तुमचे आवडते मॉडेल निवडा.
10 / 10
जर तुम्ही आयफोन 15 वर क्लिक केले असेल, तर तुम्हाला आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस पर्यायामध्ये मिळेल, आणि जर तुम्ही आयफोन 15 प्रो निवडला असेल तर तुम्हाला iPhone 15 Pro मिळेल. iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max उपलब्ध होतील. यानंतर तुमचा आवडता रंग निवडा आणि नो-ट्रेड इन पर्याय निवडा. जर तुम्हाला अपघाती नुकसान संरक्षण हवे असेल तर Apple Care+ निवडा आणि नसल्यास Applecare + कव्हरेज निवडा. शेवटी तुम्ही पेमेंट पर्याय निवडा.
टॅग्स :Apple IncअॅपलMobileमोबाइल