iphone-16-not-be-sold-in-indonesia-government-ban-apple-iphone16
Apple News : Apple कंपनीला मोठा धक्का! या देशाने iPhone १६ वर घातली बंदी; नेमकं काय घडलं? By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 2:10 PM1 / 5सप्टेंबर महिन्यात भारतात Apple कंपनीचा आयफोन १६ लाँच झाला. देशात मेट्रो सिटीमध्ये हा फोन घेण्यासाठी चेंगराचेंगरी होण्याचं बाकी राहीलं होतं. यावरुन आयफोनची क्रेझ समजू शकते. असे असताना इंडोनेशियाने नुकतेच Apple च्या iPhone 16 ला देशात विक्री किंवा ऑपरेट करण्यावर बंदी घातली आहे. 2 / 5इंडोनेशियाचे उद्योग मंत्री अगुस गुमिवांग कार्तासस्मिता यांनी मंगळवारी या संदर्भात एक घोषणा केली. देशात बंदी घालण्यासोबत नागरिकांनी हे उपकरण परदेशातून विकत घेऊ नका असा इशाराही दिला आहे. जर कोणीही इंडोनेशियामध्ये आयफोन १६ वापरत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. असं आढळल्यास सरकारला याची माहिती द्यावी, असं आवाहनगी कार्तासस्मिता यांनी केलं.3 / 5अॅपलने इंडोनेशियामध्ये गुंतवणूक करण्याचे आश्वासन पूर्ण न करणे हे या बंदीचे कारण आहे. कंपनीने वचन दिलेल्या १.७१ ट्रिलियन रुपियापैकी फक्त १.४८ ट्रिलियन रुपिया (सुमारे ९५ दशलक्ष डॉलर) गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे २३० अब्ज रुपिया (सुमारे १४.७५ दशलक्ष डॉलर) कमी आहे.4 / 5TKDN प्रमाणपत्राचा विस्तार अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे अॅपलचा आयफोन १६ विकण्यास इंडोनेशियामध्ये परवानगी नाही, असं महिन्याच्या सुरुवातील मंत्री म्हणाले होते. वास्तविक, सरकार अॅपलच्या गुंतवणुकीची वाट पाहत आहे. TKDN (Domestic component level) प्रमाणपत्रासाठी कंपन्यांना ४०% स्थानिक सामग्री मूल्य असणे आवश्यक आहे.5 / 5कंपनी इंडोनेशियामध्ये संशोधन आणि विकास सुविधा उभारण्याचा विचार करेल, असे संकेत अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी दिले होते. टिम कुक यांनी एप्रिलमध्ये जकार्ता येथे अध्यक्ष जोको विडोडो यांच्याशी संभाव्य उत्पादन योजनांवर चर्चा केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications