शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IPO असावा तर असा! १६०० टक्क्यांचा रिटर्न, ₹१.५० लाखांवर झाला ₹२५.७५ लाखांचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 2:33 PM

1 / 5
शेअर बाजारात तुम्ही जितका जास्त वेळ गुंतवणूक करून ठेवाल तितका जास्त नफा मिळतो असे म्हणतात. जेव्हा एखादा गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतो तेव्हा त्याला अपेक्षा असते की ती कंपनी त्याला काही वर्षांत मोठा नफा मिळवून देईल.
2 / 5
हाय-टेक पाईप्स ही अशा कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी वर्षानुवर्षे गुंतवणूकदारांचा विश्वास कायम ठेवला आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने 1600 टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. पाहूया याबद्दल अधिक माहिती.
3 / 5
हायटेक पाईप्सचा IPO फेब्रुवारी 2016 मध्ये उघडला होता. तेव्हा कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 50 रुपये होती. मंगळवारी म्हणजेच 3 जानेवारी 2023 रोजी या शेअरची किंमत वाढून 1600 रुपयांवर पोहोचली.
4 / 5
म्हणजेच आयपीओपासून आतापर्यंत ज्या कोणत्याही गुंतवणूकदाराने कंपनीच्या शेअर्सवर विश्वास ठेवला असेल, त्याचे नशीब नक्कीच बदलले असेल. या सात वर्षांत, कंपनीने पोझिशनल गुंतवणूकदारांना 1600 टक्के परतावा दिला आहे. गेल्या 3 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किमत 1125 टक्क्यांनी वाढली आहे.
5 / 5
कंपनीने आपल्या IPO ची किंमत 50 रुपये निश्चित केली होती. तसेच लॉट साइज 3000 शेअर्सचा होता. अशा परिस्थितीत, ज्या गुंतवणूकदाराला कंपनीचे शेअर्स वाटप करण्यात आले आहे त्यांनी किमान 1.50 लाख रुपये खर्च केले असतील. मंगळवारचा दर पाहिल्यास, तेव्हापासून गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीचं मूल्य वाढून 25.75 लाख झाले असेल. (या लेखात शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्याला.)
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगMONEYपैसाInvestmentगुंतवणूक