शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

₹११२५ वर आला होता IPO, आता ₹१५० वर आला शेअर; एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 5:03 PM

1 / 7
गेल्या एक वर्षापासून, ब्युटी आणि फॅशन ई-कॉमर्स मार्केटप्लेस नायकाची (Nykaa) मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सच्या शेअर्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी, आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आणि त्याची किंमत 150 रुपयांच्या पुढे गेली.
2 / 7
गेल्या एक वर्षापासून, ब्युटी आणि फॅशन ई-कॉमर्स मार्केटप्लेस नायकाची (Nykaa) मूळ कंपनी FSN ई-कॉमर्सच्या शेअर्सच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी, आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आणि त्याची किंमत 150 रुपयांच्या पुढे गेली.
3 / 7
त्याचबरोबर हा शेअर आणखी वाढणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ब्रोकरेज कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज, जेफरीज आणि नोमुरा यांच्यासह दिग्गज कंपन्यांनी या शेअरला बाय रेटिंग दिलंय.
4 / 7
कोटक इन्स्टिट्युशनल इक्विटीनं याला 210 रुपयांचं टार्गेट प्राईज सेट करत बाय रेटिंग कायम ठेवलंय. पर्सनल केअर कॅटेगरीमध्ये या कंपनीचा व्यवसाय वाढण्याची चिन्ह आहेत.
5 / 7
याप्रकारे जेफरीजनं शेअरसाठी टार्गेट प्राईज 200 रुपये निश्चित केलंय. यासोबतच बाय रेटिंगही दिलंय. नायकाच्या बीपीसीमध्ये ऑर्डरबुक मजूबत आहे. तसंच ऑर्डर फ्रिक्वेन्सीमध्ये वाढ दिसून येत आहे.
6 / 7
ब्रोकरेज नोमुराबद्दल सांगायचं झालं तर त्यांची याचं टार्गेट प्राईज 183 रुपये ठरवलं आहे. याशिवाय त्यांनीही या शेअरला बाय रेटिंग दिलंय. हा शेअर 27 टक्क्यांची तेजी दर्शवत आहे.
7 / 7
नोव्हेंबर 2021 मध्ये नायका शेअर बाजारात लिस्ट झाली होती. याची इश्यू प्राईज 1125 रुपये निश्चित करण्यात आली होती. या शेअरचं लिस्टिंग 2000 रुपयांवर झालं. गुंतवणूकदारांचा पैसा जवळपास दुप्पट झाला होता. (टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक