शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Share Market IPO : शेअर बाजाराचा मूड बिघडला, अडकले तब्बल १.६ लाख कोटींचे आयपीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 12:57 PM

1 / 8
Share Market IPO : शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सुमारे १.६ लाख कोटी रुपयांचे आयपीओ (IPO) अडकले आहेत. कंपन्या आणि गुंतवणूकदार बाजार पूर्वपदावर येण्याची वाट पाहत आहेत. त्यापैकी सुमारे ८९ हजार कोटी रुपयांच्या आयपीओलाही मंजुरी मिळाली आहे. परंतु बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता कंपन्या आयपीओ आणण्याचं साहस करण्याच्या विचारात दिसत नाहीत.
2 / 8
तर दुसरीकडे मात्र सेबीच्या कठोरतेमुळे काही आयपीओंना अद्याप मंजुरी मिळू शकलेली नाही. गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सेबी अनेक बाबींवर कंपन्यांचे मूल्यांकन तपासत आहे.
3 / 8
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनाचं संकट आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील गुंतवणूकदार सध्या गुंतवणूक करण्यासाठी हात आखडता घेत आहेत. तर दुसरीकडे गुंतवणूकदारांकडून सावधरित्या पावलं उचलली जात आहेत.
4 / 8
भारतीय बाजाराबाबतही गुंतवणूकदारांची तीच भूमिका आहे. प्राईम डेटाबेसच्या एका अभ्यासानुसार भारतात १.६ लाख कोटींच्या संभाव्य आयपीओमध्ये त्या कंपन्या सामील आहेत ज्यांना ८९४६८ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडून मंजुरी मिळाली आहे. तर अन्य ६९३२० कोटी रूपयांच्या आयपीओ मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
5 / 8
भारतासह जगातील महागाईने २० ते ४० वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेशिवाय युरोपातील अनेक देशांनी व्याजदर वाढवले ​​आहेत.
6 / 8
त्यामुळे भारतासह इतर विकसनशील देशांतील गुंतवणूकदार अमेरिका आणि युरोपमधून भांडवल बाहेर काढत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात प्रचंड अस्थिरता आहे. या स्थितीत मान्यता मिळूनही आयपीओ आणण्याचे धाडस कंपन्या करू शकत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
7 / 8
आतापर्यंत, महागड्या मूल्यांकनांमुळे SEBI ने २४ हजार कोटींचे आयपीओ (IPOs) रोखून ठेवले आहेत. सेबीच्या कठोर निर्णयांमुळे स्टार्टअप आणि टे कंपन्यांसाठी शेअर बाजारातील लिस्टिंग कठीण होऊ शकते. उच्च मूल्यांकनानं गुंतवणूकदारांना आता सतर्क केलं आहे, अशी प्रतिक्रिया सॉल्व्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित बन्सल यांनी दिली.
8 / 8
गुंतवणूकदार आता पैसे लावण्यापूर्वी स्टार्टअपच्या मूल्यांकनाशिवाय त्यांच्या व्हॅल्यू क्रिएशनला प्राधान्य देत आहेत. सोबतच जगभरातील केंद्रीय बँकांनी व्याज दर वाढवल्यानं बाजारातील तरलता कमी झाली आहे. यामुळे स्टार्टअप्सना बाजारातून पैसे उभे करण्यासही समस्या येत आहेत.
टॅग्स :IPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक