शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

IRCTC ची खास ऑफर; आज मिळतेय २००० रुपयांची कॅशबॅक! जाणून घ्या, कसा घेता येईल फायदा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 2:09 PM

1 / 9
नवी दिल्ली : Indian Railways : ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगची सुविधा देणाऱ्या भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.
2 / 9
आयआरसीटीसीकडून ग्राहकांना आय-मुद्रा (iMudra) अॅपची सुविधा देण्यात येत आहे. या अ‍ॅपमध्ये ग्राहकांना डिजिटल कार्ड मिळते, जे पेमेंट आणि ऑनलाइन शॉपिंगसाठी वापरले जाते.
3 / 9
आयआरसीटीसी सध्या ग्राहकांना IRCTC iMudra VISA / RuPay कार्डवर 2000 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर करीत आहे. आयआरसीटीसीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
4 / 9
'ग्राहकांनी आपल्या आवडत्या अॅपवर IRCTC iMudra वर VISA/RuPay कार्डचा वापरुन पैसे भरावे आणि 5000 रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यानंतर 2000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल, असे IRCTC iMudra ने ट्विटमध्ये म्हटले आहे.
5 / 9
दरम्यान, ही ऑफर फक्त 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. म्हणजेच, या ऑफरचा आजचा दिवस शेवटचा असणार आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा आजच फायदा घेता येणार आहे.
6 / 9
हे कार्ड फेडरल बँकेच्या सहकार्याने आयआरसीटीसीने लाँच केले होते. भारतीय वेबसाइटवर खरेदी, पैसे ट्रान्सफर आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी आयमुद्रा व्हिसा कार्डचा वापर केला जाऊ शकतो.
7 / 9
तुम्ही फक्त भारतीय वेबसाइटवर खरेदी करण्यासाठी आपले iMudra व्हिसा कार्ड वापरू शकता. यासह खरेदी केवळ भारतीय चलनातच झाली पाहिजे.
8 / 9
तुमच्या IRCTC iMudra वॉलेटमध्ये पैसे अॅड करण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, यूपीआय किंवा क्रेडिट कार्ड वापरू शकता. पैसे अ‍ॅड करण्यासाठी तुमच्या iMudra अ‍ॅपवर अ‍ॅड मनी ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रक्कम निवडावी लागेल आणि ती वॉलेटमधे अॅड करावी लागेल.
9 / 9
याचबरोबर, या सुविधेद्वारे एटीएममधून पैसे काढू शकता, परंतु त्यासाठी आयआरसीटीसी iMudra वर साइन अप करणे आवश्यक आहे. या अ‍ॅपमध्ये युजर्सला टॅप अँड पे (Tap & Pay)ची सुविधा मिळते.
टॅग्स :IRCTCआयआरसीटीसीIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेbusinessव्यवसाय