irctc stock share price again plunge 15 percent only sellers in this stock should you invest
IRCTC चे Shares पुन्हा १५ टक्क्यांनी आपटले; स्टॉक खरेदी करावे का? पाहा काय म्हणतात तज्ज्ञ By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 1:48 PM1 / 10IRCTC च्या Shares मध्ये सलग दुसऱ्या दिवशी जबरदस्त घसरण पाहायला मिळालीय बुधवारीदेखील कामकाजादरम्यान IRCTC चे शेअर्स १५ टक्क्यांपर्यंत आपटले होते. 2 / 10गेल्या काही दिवसांपासून IRCTC च्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. परंतु मंगळवारी अखेरच्या सत्रात हे शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटले. त्यानंतर बुधवारीदेखील या शेअर्समधील घसरण कायमच दिसून आली. 3 / 10सप्टेंबर महिन्यापासून IRCTC च्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत होती. मंगळवारीच कामकाजादरम्यान IRCTC च्या शेअर्सनं ६३९३ रूपयांच्या आपला ऑल टाईम हायचा पल्ला गाठला होता. परंतु त्याच दिवशी शेअर बाजार बंद होण्यापूर्वी शेअर्स मोठ्या प्रमाणात आपटले. IRCTC च्या शेअर्समध्ये २० ऑक्टोबर रोजी फ्युचर ऑप्शनमध्ये व्यवसाय होत नव्हता. 4 / 10NSE च्या F&O बॅन लिस्टमध्ये IRCTC ला सामिल करण्यात आलं आहे. दरम्यान ९५ टक्के मार्केट वाईड पोझिशन लिमिट क्रॉस केल्यामुळे (MWPL) फ्युचर ऑप्शनवर निर्बंध घालण्यात आल्याचं NSE नं सांगितलं. व्होडाफोन आइडिया, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनँन्स, सन टीवी, भेल, नॅशनल एल्युमीनियम, एस्कॉर्ट्स आणि अमारा राजा बॅटरीज च्या शेअर्सना F&O च्या बॅन लिस्टमध्ये सामील करण्यात आलं आहे. यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून फ्यूचर्स अँड ऑप्शंस (एफअँडओ) वर बॅन केलं आहे.5 / 10आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये अचानक घसरण झाल्याने गुंतवणूकदार अडचणीत सापडले आहेत. 'गेल्या एका महिन्यात आयआरसीटीसीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली होती आणि प्रॉफिट बुकिंगची प्रतीक्षा होती. परंतु यात जास्त घसरण होण्याची शक्यता नाही. कारण याचा मोठ्या प्रमात हिस्सा भारत सरकारकडे आहे. परंतु याचा अर्थ असाही नाही की इतक्या घसरणीवर पैसे लावले पाहिजे,' अशी प्रतिक्रिया Profitmart Securities चे संशोधन प्रमुख अविनाथ गोरक्षकर म्हणाले. 6 / 10पुढील काही सत्रांमध्ये बाजारात घसरण दिसून येईल. यामुळे IRCTC च्या शेअर्समध्ये अजूनही घसरण होऊ शकते. फिस्कल इयर २०२२ च्या सप्टेंबर तिमाहिचे निकाल येईपर्यंत IRCTC चे शेअर्स मर्यादित कक्षेत ट्रेंड करतील असंही त्यांनी नमूद केलं. 7 / 10IRCTC च्या शेअर्समध्ये पुढे काय करायला हवं यावर मिंटच्या वृत्तानुसार चॉईस ब्रोकिंगचे समीत बागडिया यांनी सांगितलं की, 'चार्टमध्ये IRCTC च्या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. परंतु सध्या गुंतवणूकादारांना ही शेअर्स खरेदी करण्यापासून थांबलं पाहिजे. IRCTC च्या शेअर्सचा मजबूत रेझिस्टंस लेव्हल ६०००-६१०० रूपयांवर आहे. परंतु याची सपोर्ट लेव्हल मात्र ५०००-५१०० रूपयांवर दिसून येत आहे.'8 / 10IRCTC च्या शेअर्समध्ये सप्टेंबर महिन्यापासून तेजी पाहायला मिळाली होती. १ सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअरची किंमच २७३० रूपये होती. परंतु यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत हा शेअर ४ हजार रूपयांच्या जवळ पोहोचला. 9 / 10दरम्यान, ऑक्टोबर महिन्यातही शेअर्समध्ये तेजीचं सत्र सुरू होतं. दीर्घ कालावधीसाठी हा शेअर २ हजार रूपयांच्या टप्प्यात होता. परंतु कंपनीनं शेअर स्प्लिट करण्याची घोषणा केल्यानंतर या शेअर्सच्या किंमतीत तेजी दिसून आली. 10 / 10२८ ऑक्टोबर रोजी IRCTC च्या शेअर्स स्प्लिटची प्रक्रिया केली जाणार आहे. सध्या या शेअरची फेस व्हॅल्यू १० रूपये इतकी आहे. परंतु शेअर्स स्प्लिटनंतर या शेअरची फेस व्हॅल्यू २ रूपये होणार आहे. याशिवाय याचा ISIN क्रमांकदेखील बदलला जाणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications