शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

15 दिवसांत आली 275% ची तुफान तेजी, आता जबरदस्त आपटला शेअर; IPO मध्ये 32 रुपये होती किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 8:42 PM

1 / 9
शेअर बाजारात 15 दिवसांत मल्टीबॅगर परतावा देणारी कंपनी इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा (IREDA) शेअर जबरदस्त आपटला आहे. या सरकारी कंपनीचा शेअर शुक्रवारी 10 टक्क्यांच्या घसरणीसह 108.19 रुपयांवर बंद झाला.
2 / 9
प्रॉफिट बुकिंगमुळे शेअर्समध्ये ही घसरण झाली आहे. मिनी रत्न कंपनी IREDA चा IPO गेल्या महिन्यात 21 नोव्हेंबर रोजी खुला झाला होता आणि याची किंमत 30-32 रुपये एवढी होती. कंपनीचा शेअर 14 डिसेंबर 2023 रोजी 123.37 रुपयांवर पोहोचला होता. हा कंपनीच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.
3 / 9
इश्यू प्राइसपेक्षा 275% ने वधारला शेअर - सरकारी कंपनी इरेडाचा आयपीओ 21 नोव्हेंबरला खुला झाला होता 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत ओपन होता. कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड 30-32 रुपये एवढा होता. कंपनीचा शेअर 32 रुपये दराने अॅलॉट झाला होता.
4 / 9
मिनी रत्न कंपनी इरेडाचा शेअर 29 नोव्हेंबर रोजी 50 रुपयांवर लिस्ट झाला होता. लिस्टिंगपासून कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे. 14 डिसेंबर 2023 रोजी IREDA चा शेअर 123.37 रुपयांवर पोहोचला.
5 / 9
कंपनीच्या शेअरने इश्यू प्राइसपासून 275 टक्क्यांची उसळी घेतली आहे. यामुळे ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये कंपनीचे शेअर्स मिळाले ते मालामाल झाले आहेत.
6 / 9
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचा आयपीओ टोटल 38.80 पट सब्सक्राइब झाला आहे. या सरकारी कंपनीच्या आयपीओमध्ये रिटेल इनव्हेस्टर्सच्या कॅटेगिरीमध्ये 7.73 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे.
7 / 9
नॉन-इंस्टीट्यूशनल इनव्हेस्टर्स (NII) कोट्यात 24.16 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. तर क्वॉलीफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) कोट्यात 104.57 पट सब्सक्रिप्शन मिळाले आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये एंप्लॉयीजच्या कॅटेगिरीत 9.80 पट सब्सक्रिप्शन मिळाले.
8 / 9
महत्वाचे म्हणजे, इरेडाच्या आयपीओमध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स किमान 1 लॉट आणि जास्तीत जास्त 14 लॉट साठी बोली लावू शकत होते. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 460 शेअर आहेत.
9 / 9
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगInvestmentगुंतवणूकStock Marketशेअर बाजार