शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘के लॉलीपॉप लागेलू..,’ भोजपुरीतून ट्वीट करतायत Elon Musk! जाणून घ्या नक्की झालंय काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2022 1:36 PM

1 / 10
Elon Musk गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहेत. ट्विटरच्या डीलमुळे ते चर्चेत आहेत. डील पूर्ण झाल्यानंतर मस्क यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरूवात केली आहे. त्यांना ट्विटरला एक प्रॉफिटेबल कंपनी बनवायचं आहे. परंतु आता पुन्हा एका त्यांचंच ट्विटर अकाऊंट हे चर्चेचा विषय ठरतंय.
2 / 10
अनेक नेटकरी मस्क यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय का असा सवाल करत आहेत. तसा प्रश्न विचारला जाणंही स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या फोनमधून भोजपूरी आणि हिंदी भाषेत ट्वीट केली जात आहेत.
3 / 10
दरम्यान, एका रात्रीत मस्क यांनी भोजपूरी किंवा हिंदी शिकलंय असं होऊ शकत नाही. तसंच त्यांनी शिकलंही असेल तरी ते भोजपूरी गाणी का ट्वीट करत आहेत. परंतु हा खेळ एका ट्विटर अकाऊंटवरून होत आहे.
4 / 10
हे संपूर्ण कनफ्युजन ट्विटर युझर iawoolford झालं आहे. यानं ट्विटर प्लॅटफॉर्मवर आपलं नाव बदलून इलॉन मस्क केलं आहे. इतकंच नाही तर मस्क यांनी ठेवलेला डीपी आणि कव्हर फोटोही त्यांनी लावला आहे.
5 / 10
यामुळेच हे सगळं कनफ्युजन पसरलं आहे. मस्क यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटचं नाव Elonmusk असं आहे. त्यांनी 2009 मध्ये ट्विटर सुरू केलं होतं. ज्या व्यक्तीमुळे हे कनफ्युजन होत आहे त्यानं 2011 मध्ये ट्विटरवर अकाऊंट सुरू केला आहे.
6 / 10
यात कनफ्युजन होण्याची सर्वात मोठी बाब म्हणजे दोन्ही अकाऊंट व्हेरिफाईड आहेत. यावरू मस्क यांचं अकाऊंट हॅक झालं नाही हे तर स्पष्ट झालंय. ट्विटरची धुरा आपल्या हाती घेतल्यानंतर मस्क यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली आहे.
7 / 10
ट्विटर डील झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सीईओ पराग अग्रवाल, सीएफओ नेड सेगल आणि पॉलिसी हेड विजया गाडे यांना कामावरून काढलं होतं. मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्सना ट्विटरचा व्यवहार केला आहे.
8 / 10
या डीलची सुरूवात एप्रिलमध्ये झाली होती. सुरूवातीला त्यांनी ट्विटरमधील 9.2 टक्के हिस्सा खरेदी केला होता. त्यानंतर त्यांना संचालक मंडळात सहभागी होण्यास सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी त्यास नकार दिला.
9 / 10
नंतर त्यांनी ट्विटरच्या खरेदीसाठी 44 अब्ज डॉलर्सची ऑफर दिली होती. सुरूवातीला स्टेकहोल्डर्सनं याला नकार दिला. परंतु नंतर ते तयार झाले. मे मध्ये ट्विटरने एसईसी फायलिंगमध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर केवळ 5 टक्के बॉट्स अकाऊंट असल्याचं म्हटलं आणि यानंतर ट्विटर मस्क वादाला सुरूवात झाली.
10 / 10
यावर बॉट्स अकाऊंट अधिक असल्याचं मस्क सांगत होते. याबाबत त्यांनी डीलही होल्डवर टाकली होती. यानंतर ट्विटरनं कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ट्रायल सुरू होण्यापूर्वीच मस्क यांनी ही डील पूर्ण केली.
टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर