शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 12:15 PM

1 / 11
EPF : स्वत:चं घर असणे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी आपण बँकेतून होमलोन घेत असतो. होमलोन तर मिळतं, पण ते भागवण्याच सर्वात मोठं टेन्शन असतं. त्या लोनचे हप्ते खूप असतात त्यामुळे ते कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो.
2 / 11
जास्त महिने EMI चा भार सहन करावा लागतो. या परिस्थितीत, गृहकर्ज लवकर संपवण्यासाठी अनेकजण प्री-पेमेंटचा पर्याय शोधतात. यासाठी ईपीएफ खात्यातील रक्कम उपयुक्त ठरू शकते.
3 / 11
होमलोनची परतफेड करण्यासाठी अनेकजण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) पैशातून गृहकर्जाची परतफेड करण्याचा प्लॅन करतात. जर तुम्हाला EPF मधून गृहकर्जाची परतफेड करायची असेल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात लागतील.
4 / 11
EPF ही सर्वाधिक व्याज देणाऱ्या योजनांपैकी एक योजना आहे. पण, जर तुमच्या गृहकर्जावरील व्याजदर EPF वर उपलब्ध असलेल्या व्याजदरापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही ही रक्कम कर्जाच्या पूर्व पेमेंटसाठी वापरू शकता. उदाहरणार्थ, सध्या EPF वर ८.२५ टक्के व्याजदर आहे.
5 / 11
बहुतेक बँका ८.५ ते १० टक्के दराने गृहकर्ज देत आहेत. जर तुमच्या गृहकर्जाचा दर ९ टक्के किंवा त्याहून अधिक असेल, तरच तुम्ही EPF रकमेतून गृहकर्जाच्या प्री-पेमेंटचा पर्याय पाहावा.
6 / 11
जर तुम्ही तरुण असाल आणि तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात असाल, तर तुम्ही EPF पैशाने गृहकर्जाची परतफेड करण्याचा पर्याय निवडू शकता, कारण तुम्हाला तुमचा सेवानिवृत्ती निधी पुन्हा तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.
7 / 11
EPFO गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी जमा केलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त ९० टक्के रक्कम काढण्याची परवानगी देते. पण, यासाठी तुम्हाला किमान १० वर्षांच्या सेवेची अट पूर्ण करावी लागेल. गृहकर्ज परतफेड योजनेअंतर्गत, EPFO ​​सदस्य त्यांच्या खात्यातून EMI भरू शकतात.
8 / 11
ईपीएफ हा तुमच्या निवृत्तीच्या नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे तिथून पैसे काढण्यापूर्वी तुम्ही काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. हा शेवटचा पर्याय म्हणून वापरून पाहिला पाहिजे. पण हे पैसे काढले तर तुमच्या सेवानिृत्तीवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे याचाही विचार केला पाहिजे.
9 / 11
यावर सध्या ८.२५ टक्के व्याज दिले जात आहे. तुम्ही EPF मधून जितकी जास्त रक्कम काढाल तितका तुमच्या निवृत्ती निधीवर जास्त परिणाम होईल. तसेच, ईपीएफमधून पैसे काढताना तुम्हाला कर नियम चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजेत. काही प्रकरणांमध्ये, कर देखील भरावा लागेल. याव्यतिरिक्त, मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.
10 / 11
ईपीएफओ ई-सेवा पोर्टलवर लॉग इन करा.यानंतर UAN आणि पासवर्ड टाका. Online Services वर क्लिक करा. फॉर्म 31 द्वारे तुमचा दावा करा. तुमचे बँक तपशील यात भरा.
11 / 11
पैसे काढण्याचे कारण निवडा. संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीHomeसुंदर गृहनियोजनbusinessव्यवसाय