शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुमचे आधार कार्ड बनावट तर नाही ना? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 12:47 PM

1 / 7
सरकारी कामासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यापैकी एक म्हणजे आधार कार्ड, बँकेत खाते उघडायचे असेल, गॅस जोडणी, रेशन कार्ड बनविणे किंवा सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड द्यावे लागते. पण, आधार कार्ड हेच बनावट निघाले तर?
2 / 7
भामटे पैशांसाठी लोकांचे बनावट आधार कार्ड काढून अनेक प्रकारे घोटाळा करताताच, शिवाय सर्वसामान्यांच्या हक्कांवरही गदा आणतात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड खरे की खोटे, हे अशा पद्धतीने ओळखता येईल.
3 / 7
1) भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधार कार्डची पडताळणी करता येईल.
4 / 7
2) वेबसाईटवर लॉगिन ऑप्शनवर क्लिक करून तेथे १२ आकडी आधार क्रमांक टाकावा. स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड पुरवावा.
5 / 7
3) सेंड ओटीपी या पर्यायावर क्लिक करावे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ते टाकून लॉगिन करावे.
6 / 7
4) लॉगिन केल्यानंतर सर्व्हिसेसचे विविध पर्याय उघडल्यास तुमचे आधार कार्ड योग्य आहे. डाउनलोड आधार, ऑर्डर पीव्हीसी इत्यादी पर्याय त्यात आहेत. हे पर्याय आले नाही, तर समजून घ्या तुमच्या आधार कार्डमध्ये काहीतरी गडबड आहे.
7 / 7
5) ओटीपी आला नाही, तरीही एक धोक्याची घंटा आहे. अशा वेळी आधार केंद्रावर जाऊन सर्व माहिती पडताळून पाहावी, मोबाईल क्रमांक अपडेट करावा. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड