it company tcs to overtake ril in market cap
टाटांचा हुकूमी एक्का देणार अंबानींना धक्का?; पुढील आठवड्यात धमाका होण्याची शक्यता By कुणाल गवाणकर | Published: January 10, 2021 7:40 PM1 / 10देशातील दोन बड्या उद्योग समूहांमध्ये सुरू असलेल्या 'भांडवली' संघर्षात पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. टाटा आणि रिलायन्स यांच्यातील शेअर बाजारातील अंतर कमी होत आहे.2 / 10टाटा समूहानं दूरदृष्टी दाखवत स्थापन केलेली टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस (टीसीएस) शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजला धोबीपछाड देण्याची दाट शक्यता आहे.3 / 10पुढील काळ माहिती तंत्रज्ञानाचा असेल याचा अचूक अंदाज बांधत टाटा समूहाच्या धुरिणींनी टीसीएसची मुहूर्तमेढ रोवली. टाटा समूहाच्या महसुलात टीसीएसचा वाटा मोठा आहे. 4 / 10आता टीसीएस भांडवली बाजारमूल्यात मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला धक्का देईल अशी परिस्थिती आहे. कारण सध्याच्या घडीला दोन्ही कंपन्यांच्या भांडवली बाजारमूल्यात अतिशय कमी फरक राहिला आहे.5 / 10कोरोना संकटात टीसीएस आणि आरआयएलच्या बाजारमूल्यात वाढ झाली. मात्र गेल्या काही महिन्यांपासून रिलायन्सच्या समभागांचे मूल्य घसरताना दिसतं आहे. त्याचा परिणाम बाजारमूल्यात झाला आहे. 6 / 10रिलायन्सचं बाजारमूल्य घसरत असताना टीसीएसचं बाजारमूल्य वधारलं आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचं बाजारमूल्य ३४.२९६.३७ कोटी रुपयांनी कमी झालं. सध्याच्या घडीला कंपनीचं बाजारमूल्य १२,२५,४४५.५९ कोटी इतकं आहे.7 / 10गेल्या आठवड्याभरात टीसीएसचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं. मुंबई शेअर बाजारात टीसीएसच्या बाजारमूल्यात ७१,१०२.०७ कोटी रुपयांची वाढ झाली.8 / 10सध्याच्या घडीला टीसीएसचं बाजारमूल्य ११,७०,८७५.३६ कोटी रुपये इतकं आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांच्या बाजारमूल्यातील फरक वेगानं कमी होताना दिसत आहे.9 / 10जाणकारांच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात टीसीएस रिलायन्सला धोबीपछाड देऊन देशातील क्रमांक एकची कंपनी होऊ शकेल. ८ जानेवारीला टीसीएसनं आर्थिक तिमाहीची आकडेवारी घोषित केले आहेत. या तिमाहीत टीसीएसची कामगिरी उत्तम झाली आहे. 10 / 10आर्थिक तिमाहीत चांगली कामगिरी झाल्यानं शेअर बाजारातील टीसीएसच्या समभागांचा भाव वधारेल. त्यामुळे टीसीएसचं बाजारमूल्य वाढेल, असा जाणकारांचा अंदाज आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications