गोल्ड लोन घेणे सोपे, फेडणे मात्र..? By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 10:41 AM
1 / 8 भारतीयांना सोन्याचा फार हव्यास असतो. अडीअडचणीच्या काळात सोनेच कामाला येते, ही त्यामागची भावना. त्यामुळे सोने जमविण्याचा हट्टाग्रह असतो. कोरोनाकाळात तर ते प्रकर्षाने जाणवले. आता कोरोनातून अर्थव्यवस्था सावरत असताना गोल्ड लोनच्या मागणीने जोर धरला आहे. 2 / 8 क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात क्रिसिलने यंदाच्या आर्थिक वर्षात गोल्ड लोनची मागणी वाढू शकते, असे म्हटले आहे. 3 / 8 बिगरबँकिंग वित्तीय संस्थांकडील (एनबीएफसी) परिसंपत्ती (ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट) चालू आर्थिक वर्षात १८ ते २० टक्क्यांनी वाढून १.३ लाख कोटींपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचे क्रिसिलचे म्हणणे आहे. 4 / 8 कोरोनानंतर सावरू लागलेली अर्थव्यवस्था आणि सणासुदीचा काळ यांमुळे गोल्ड लोनच्या मागणीत वाढ झाली आहे. 5 / 8 वैयक्तिक कर्जापेक्षा गोल्ड लोन सुरक्षित समजले जाते. अनेकदा कर्जाची रक्कम लहान असते त्यामुळे बँकांकडे न जाता ग्राहक एनबीएफसींकडे जातात. एनबीएफसींनी त्यांच्या गोल्ड लोनवरील व्याजदरात पर्यंत कपात केली आहे. 6 / 8 बँकांकडूनही साडेसहा ते १३ टक्के व्याजावर गोल्ड लोन मिळते. परंतु तरीही ग्राहकांचा ओढा एनबीएफसींकडे अधिक आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर गोल्ड लोन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 7 / 8 गोल्ड लोन देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बिगरबँकिंग वित्तीय संस्थाचा व्यवसाय वाढणार असला तरी त्यांच्या चिंतेत भरही पडण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 8 / 8 गोल्ड लोन न फेडणाऱ्यांचे प्रमाण मोठे असून त्यामुळे लोन देताना एनबीएफसींना सर्व बाबी पडताळून मगच कर्जे देता येणार आहेत. आणखी वाचा