itc Shares give bumper returns market cap reach on rs 6 lakh crore
सिगारेट विकणाऱ्या कंपनीचा धमाका! शेअरनं रेकॉर्ड तोडत दिला बम्पर परतावा; गुंतवणूकदार मालामाल By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 9:57 PM1 / 7देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी FMCG कंपनी असलेल्या ITC च्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे. सिगारेट विकणाऱ्या या कंपनीने आज आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. आता ही कंपनी मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. तिचे बाजार भांडवल 6 लाख कोटी रुपयांच्याही वर गेले आहे.2 / 7आज 20 जुलैला ITC च्या शेअरने त्यांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. इंट्राडेमध्ये NSC वर ITC शेअर 2.64 टक्क्यांनी वधारून 491.50 रुपयांवर पोहोचला आहे. यानंत आयटीसीचे बाजार भांडवल 6.10 लाख कोटी रुपये झाले आहे.3 / 7बाजार भांडवलाचा विचार करता ही देशातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी बनली आहे. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे आयटीसी शेअर्समध्ये वाढ झाली आहे. विदेशी गुंतवणूकदार या देशांतर्गत कंपनीत मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवत आहेत.4 / 7ट्रेंडलाइनवर उपलब्ध आकडेवारीनुसार, डिसेंबर 2021 च्या तिमाहीत ITC मधील FII ची हिस्सेदारी 10 टक्के होती, जी मार्च 2022 तिमाहीत 12 टक्के आणि एप्रिल-जून 2022 मध्ये 12.7 टक्क्यांवर पोहोचली. जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये FII ची हिस्सेदारी 42.7 टक्क्यांवर पोहोचली. जून 2023 च्या तिमाहीत ती 43.6 टक्क्यांपर्यंत पोहोचली.5 / 7वर्षभरात 65 टक्के परतावा - ITC शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांक रु. 293.40 आहे. मात्र, गेल्या एका वर्षात हा शेअर 491.70 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, एका वर्षात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 65 टक्के परतावा दिला आहे. 6 / 72023 चा विचार करता, या वर्षात या स्टॉकमध्ये 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा शेअर 10 टक्क्यांनी वधारला आहे.7 / 7(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) आणखी वाचा Subscribe to Notifications