शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ITR Filling : आयटीआर भरला नाही? किती होणार दंड, होऊ शकतो तुरुंगवास; काय आहे कायद्यात तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2022 10:49 AM

1 / 7
प्राप्तिकर विभागाची आयटीआर दाखल करण्याची तारीख ३१ जुलै रोजी संपली. प्राप्तिकर विभाग प्रत्येकाला वेगवेगळ्या माध्यमातून वेळेवर रिटर्न भरण्याचा सल्ला देत होते.
2 / 7
सध्या अनेक लोक आयटीआर दाखल करण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट पाहतात. बऱ्याच लोकांना वाटते की, रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली जाऊ शकते. मात्र, अद्याप तरी तशी घोषणा विभागाने केली नाही. त्यामुळे पुढे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रिटर्न वेळेवर भरले पाहिजेत.
3 / 7
जर तुम्ही तुमचे विवरणपत्र भरले नसेल, तर आता तुम्हाला ५ हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागू शकते. या दंडाची रक्कम व्यक्तीच्या उत्पन्नानुसार वाढत जाईल. याशिवाय ६ महिने ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो.
4 / 7
गुंतवणूक तज्ज्ञांनी सांगितले की, जर कोणी कमावणारी व्यक्ती ३१ तारखेपर्यंत रिटर्न भरू शकला नाही, तर तो विलंब शुल्क भरून रिटर्न भरू शकतो. नियमांनुसार, ५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तीला १ हजार रुपये आणि ५ लाख रुपये किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्तीला रिटर्न भरताना ५ हजार रुपये विलंब शुल्क भरावे लागेल.
5 / 7
सध्या अनेक लोक आयटीआर दाखल करण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट पाहतात. बऱ्याच लोकांना वाटते की, रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली जाऊ शकते. मात्र, अद्याप तरी तशी घोषणा विभागाने केली नाही. त्यामुळे पुढे कोणतीही अडचण येऊ नये म्हणून रिटर्न वेळेवर भरले पाहिजेत.
6 / 7
प्राप्तिकर विभाग आयटीआर वेळेत न भरल्यास ५० टक्के ते २०० टक्क्यांपर्यंत दंड आकारू शकतो. जर एखादी कमावती व्यक्ती शेवटच्या तारखेपर्यंत आयटीआर दाखल करण्यात अयशस्वी ठरली, तर प्राप्तिकर विभाग कर आणि व्याजासह एकूण उत्पन्नाच्या २०० टक्क्यांपर्यंत दंड आकारू शकतो.
7 / 7
प्राप्तिकर विभागाच्या सध्याच्या नियमात आयटीआर न भरल्यास ६ महिने ते कमाल ७ वर्षे तुरुंगवासाची तरतूद आहे. तथापि, प्राप्तिकर विभाग सर्व प्रकरणांमध्ये तुमच्यावर खटला भरू शकत नाही. जर कराची रक्कम १० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तरच तरच तो दावा करू शकतो.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIndiaभारत