शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ITR Refund : ITR फाईल केल्यानंतर रिफंड कमी मिळाल्यास काय करायचं? पुन्हा रिटर्न कधी भरायचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 11:16 AM

1 / 8
ITR Refund : जुलै महिन्यात आपल्यातील अनेकांनी आयटीआर फाईल केले असेल. आयटीआर केल्यानंतर तीन ते पाच आठवड्यात रिफंड मिळू शकतात, रिफंडची रक्कम किती असेल हे आपल्याला आधी समजत नाही. पण, जर आपल्याला रिफंडची रक्कम कमी मिळाली तर काय करायचं? याबाबत काही प्रोसेस आहे का? हे आज आपण जाणून घेऊ.
2 / 8
ITR Refund : आयटीआर फाईल दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलैपर्यंत ७.२८ कोटी रिटर्न भरले आहेत. आयटीआर दाखल केल्यानंतर, करदाते त्यांच्या रिफंडची प्रतीक्षा करतात. रिफंड प्रक्रिया पुढे जाणार असेल तर आयकर विभाग आधी करदात्यांना त्यांच्या रिटर्नच्या प्रक्रियेबद्दल माहिती देतो.
3 / 8
प्रक्रियेअंतर्गत, करदात्यांच्या ईमेल आयडीवर सूचना येते. तीन ते चार आठवड्यांनंतर रिफंडचे पैसे करदात्यांच्या खात्यात येतात. आयकर रिटर्न भरणाऱ्या सर्व करदात्यांना परतावा मिळत नाही. जेव्हा करदात्याने त्यांच्या देण्यापेक्षा जास्त रक्कम कर म्हणून जमा केली असेल तरच विभागाकडून परताव्याची रक्कम परत पाठवली जाते. आयकर रिटर्न प्रक्रियेदरम्यान करदात्यांच्या कराचे कॅलक्युलेशन केले जाते.
4 / 8
आयकर विभागाकडून आयकर कायदा कलम १४३ उपविभाग १ अंतर्गत करदात्यांना सूचना पाठविली जाते. विभागाकडून पाठवलेल्या तपशिलांमध्ये तुम्हाला जर तुमच्या रिफंडचे कॅलक्युलेशन चुकीचे असल्याचे दिसले, आणि जर तुमचा परतावा यापेक्षा जास्त येणार असेल तर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम १५४ अंतर्गत सुधारणा विनंती दाखल करू शकता.
5 / 8
आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन करदाते ही दुरुस्ती विनंती दाखल करू शकतात.
6 / 8
जर सूचना नोटीसबाबत काही चूक आढळली तर ई-फायलिंग पोर्टलवर विनंती केली जाऊ शकते. दुरुस्तीची विनंती पर्याय फक्त त्या रिटर्नसाठी उपलब्ध आहे, ज्यावर सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटरद्वारे प्रक्रिया केली आहे.
7 / 8
आयकर विभागाच्या माहितीनुसार, जर सूचना नोटीसबाबत काही चूक आढळली तर ई-फायलिंग पोर्टलवर विनंती केली जाऊ शकते. ज्या फाईलवर सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटरद्वारे प्रक्रिया केली आहे, त्या फाईलच्या दुरुस्ती विनंतीचा पर्याय फक्त त्या रिटर्नसाठी उपलब्ध आहे.
8 / 8
तुमच्याकडून झालेल्या इतर कोणत्याही चुकीसाठी दुरुस्ती विनंती वापर आपल्याला करता येणार नाही. आपल्याला फक्त सुधारीत परताव्यासाठीच दुरुस्ती विनंती करता येऊ शकते.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सbusinessव्यवसाय