शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आकडा पाहून चकीत व्हाल; 6.77 कोटी करदात्यांपैकी सर्वाधिक लोकांनी भरला 'शून्य कर'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 8:23 PM

1 / 5
काही दिवसांपूर्वीच(31जुलै) इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख होती. त्या तारखेपर्यंत भारतात 6.77 कोटी आयकर रिटर्न भरले गेले आहेत. हा आतापर्यंतचा सर्वाधिक ITR फायलींचा विक्रम आहे. विशेष म्हणजे, आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार, यातील बहुतांशी लोकांनी शून्य आयकर भरला आहे. जाणून घ्या, कीती लोकांनी त्यांचे उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी दाखवून 'शून्य कर' भरला आहे.
2 / 5
आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 होती. लोकांना त्यांच्या ई-व्हेरिफिकेशनसाठी आणखी 30 दिवस मिळाले आहेत. तारखेनंतर आता 5,000 रुपयांपर्यंतचा दंड भरुन ITR भरता येणार आहे. इनकम टॅक्स रिटर्नच्या आकडेवारीतून 'झिरो टॅक्स' भरणाऱ्या करदात्यांची आकडेवारी समोर आली आहे.
3 / 5
आयकर संकलन वाढवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. टॅक्स रिटर्न भरणाऱ्या लोकांच्या संख्येतही वाढ झाली आहे, परंतु यावर्षी दाखल केलेल्या 6.77 कोटी आयटीआरपैकी सुमारे 4.65 कोटींनी शून्य कर भरला आहे. म्हणजेच त्यांचे उत्पन्न 5 लाख रुपये किंवा त्याहून कमी आहे. एकूण करदात्यांच्या संख्येपैकी हे प्रमाण निम्म्याहून अधिक आहे.
4 / 5
वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात शून्य कर भरणाऱ्या करदात्यांची संख्या सुमारे 2.9 कोटी होती. देशात 4 वर्षांत आयटीआर भरणाऱ्यांची संख्या वाढली आहे, परंतु शून्य कर भरणाऱ्यांची संख्याही दुपटीहून अधिक वाढली आहे. आयकर रिटर्नचे हे आकडे तात्पुरते आहेत, कारण मोठ्या प्रमाणात आयकर परताव्याची प्रक्रिया करणे बाकी आहे.
5 / 5
आयकर रिटर्न डेटावरून असे दिसून आले आहे की, देशात 1 कोटींहून अधिक उत्पन्न दर्शविणाऱ्या करदात्यांची संख्या सुमारे 1.69 लाख आहे. 5 ते 10 लाख रुपये कमावणारे 1.10 कोटी करदाते, 10 ते 20 लाख रुपये कमावणारे 45 लाख, 20 ते 50 लाख रुपये कमावणारे 19 लाख आणि 50 लाख ते 1 कोटी रुपये कमावणारे 3.3 लाख आयकरदाते आहेत.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक