शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Income Tax रिटर्नसाठी ३१ जुलै अखेरची तारीख, पाहा तुम्हाला कोणता आयटीआर फॉर्म भरावा लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 1:09 PM

1 / 9
प्राप्तिकर टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख ३१ जुलै असून, ती अगदी जवळ आली आहे. त्यामुळे या तारखेच्या आतमध्ये आयटीआर भरणे आवश्यक आहे. अन्यथा मोठा दंड बसतो.
2 / 9
आयटीआर फॉर्म सात प्रकारचे असतात. कोणत्या करदात्याला कोणता फॉर्म भरायचा आहे हे उत्पन्न, श्रेणी किंवा कामाच्या स्वरूपाच्या आधारावर ठरविले जाते. तुम्हाला कोणता आयटीआर फॉर्म भरावा लागेल, जाणून घ्या...
3 / 9
आयटीआर फॉर्म १ (सहज) : ज्या करदात्यांना पगार, प्रॉपर्टी भाडे, व्याज, शेती आणि पेन्शनमधून ५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते, त्यांना आयटीआर फॉर्म १ म्हणजेच सहज फॉर्म भरावा लागेल. ५० लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले लोक सहज फॉर्म भरतात. जे कंपनीत संचालक पदावर आहेत किंवा ज्यांनी गैरसूचिबद्ध इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी हा फॉर्म नाही.
4 / 9
फॉर्म २ : व्यवसायासह अन्य स्रोतांद्वारे ज्यांना उत्पन्न मिळते, तसेच जे सहज फॉर्म भरू शकत नाहीत, ते आयटीआर फॉर्म २ भरू शकतात. म्हणजेच ज्यांचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा अधिक आहे असे पगारदार, पेन्शनधारक हा फॉर्म भरू शकतात.
5 / 9
फॉर्म ३ : ज्यांनी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला आहे आणि त्यांना यातून व्याज, पगार किंवा बोनस यांतून उत्पन्न मिळते, त्यांना फॉर्म ३ भरावा लागेल. कोणत्या प्रॉपर्टीपासून मिळकत येत असल्यास फॉर्म ३ च्या माध्यमातून प्राप्तिकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.
6 / 9
फॉर्म ४ (सुगम): हा फॉर्म अशा लोकांसाठी आहे ज्यांचे व्यवसाय किंवा कामातून वार्षिक उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे. तसेच ज्यांनी कलम ४४ एडी, ४४ एडीए आणि ३३ एई अंतर्गत अनुमानित उत्पन्न योजनेची निवड केली आहे, अशांसाठी हा फॉर्म आहे.
7 / 9
फॉर्म ५ : जे लोक फॉर्म १ पासून ते ४ आणि फॉर्म ६ व ७ भरू शकत नाहीत, त्यांना हा फॉर्म भरावा लागेल. हा फॉर्म ४ च्या योग्य पार्टनरशिप फर्मपेक्षा वेगळी पार्टनरशिप फर्म आणि करदात्यांसाठी आहे, ज्यांना इतर कोणताही फॉर्म चालत नाही.
8 / 9
फॉर्म ६ : कलम ११ अंतर्गत कोणतीही सवलत मिळत नसलेल्या कंपन्या आणि करदात्यांना आयटीआर फॉर्म ६ भरावा लागेल. फॉर्म ६ अशा कंपन्या भरतात, ज्या फॉर्म ७ भरणाऱ्या कंपन्यांपेक्षा वेगळ्या असतात.
9 / 9
फॉर्म ७ : हा फॉर्म अशा कंपन्यांना आणि करदात्यांना आहे, जे केवळ कलम १३९ (४ए), १३९ (४बी), १३९ (४सी) किंवा १३९ (४डी) या अंतर्गत रिटर्न फाइल करतात.
टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्सbusinessव्यवसाय