शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jackfruit Cultivation: फणसाच्या लागवडीतून कसे कमवाल लाखो रुपये? एक झाड वर्षोन् वर्ष देतं फळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 4:08 PM

1 / 8
सामान्यत: फणसाचा जास्तीत जास्त उपयोग लोक भाजी, लोणचं आणि इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी करतात. त्यामुळे बाजारातही फणसाला सीझनमध्ये चांगली किंमत देखील मिळते.
2 / 8
फणसाच्या लागवडीसाठी शेतकऱ्याला जास्त मेहनत देखील करावी लागत नाही. कोणत्याही विशेष देखरेखीशिवाय याचं पीक घेता येतं. जवळपास ८ ते १० महिन्यांच्या कालावधीत फणस फळ योग्यरित्या तयार होतं. एकदा झाडाला फळ लागलं की शेतकऱ्याला त्यापासून अनेक वर्ष यातून नफा कमावता येतो.
3 / 8
फणसाच्या लागवडीसाठी रखरखीत प्रकारचे हवामान योग्य उपयुक्त मानलं जातं. याची कोणत्याही वातावरणात लागवड करता येते. डोंगर आणि पठार परिसरातही फणसाची लागवड होऊ शकते. थोडीशी काळजी घेतल्यास हे झाड शेतकऱ्यांना काही वेळातच श्रीमंत बनवतं.
4 / 8
फणसाच्या लागवडीसाठी सिंचन आवश्यक आहे. पेरणीच्या सुरुवातीपासूनच रोपांना पाणी देणे आवश्यक आहे.
5 / 8
तज्ज्ञांच्या मते, फणसाला उन्हाळा आणि हिवाळ्यात दर 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावं लागतं. फणस त्याच्या प्रत्येक स्तरानुसार वेगवेगळ्या प्रकारे वापरला जातो.
6 / 8
मध्यम वयाच फळ जे भाजीसाठी वापरलं जातं. देठ गडद हिरव्या रंगाचं कडक आणि गाभा मऊ असेल तेव्हा त्याची काढणी करावी लागते.
7 / 8
याशिवाय, जर तुम्हाला फणसाच्या पिकलेल्या फळांचे सेवन करायचे असेल तर ते फळ लागल्यानंतर सुमारे 100-120 दिवसांनी तोडले पाहिजे.
8 / 8
जर फणसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली तर शेतकऱ्यांना वर्षाला 8 ते 10 लाखांचा नफा सहज मिळू शकतो.
टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरी