शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

घरीच सुरू करा 'हा' व्यवसाय! तुमची दर महिन्याला होईल मोठी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 3:19 PM

1 / 8
तुम्हाला जर स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती आहे. तुम्हाला घर बसल्या जॅम, जेली, मुरब्बा चा व्यवसाय सुरू करता येतो. याची मागणी सध्या बाजारात मोठी आहे.
2 / 8
या व्यवसायातून तुम्ही प्रत्येक महिन्याला १८ ते २० हजार रुपये मिळवू शकता. तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही मोठी गुंतवणूक करावी लागणार नाही. जर तुमच्या प्रोडक्टची मागणी वाढली तर तुम्ही हा व्यवसाय वाढवू शकता.
3 / 8
जॅम, जेली, मुरंबा बनवण्याच्या व्यवसायात तुम्हाला प्रथम फळे लागतात ज्यापासून तुमचे उत्पादन बनवले जाईल. जॅम आणि जेलींना फळांपासूनच चव दिली जाते. ते तयार करण्यासाठी, फळांव्यतिरिक्त, आपल्याला साखर आणि पेक्टिन आवश्यक आहे. घरी बसून कोणीही बनवू शकतो. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही.
4 / 8
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अहवालानुसार, तुम्हाला जाम, जेली, मुरंबा बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 8 लाख रुपये खर्च करावे लागतील.
5 / 8
यापैकी 1000 स्क्वेअर फूट इमारतीचे शेड तयार करण्यासाठी 2 लाख रुपये खर्च होणार तर मशिन खरेदी करण्यासाठी सुमारे साडेचार लाख रुपये लागणार आहेत. याशिवाय सुमारे दीड लाख रुपयांचे खेळते भांडवल लागेल.
6 / 8
8 लाख रुपयांच्या गुंतवणुकीने तुम्ही वर्षाला 231 क्विंटल जॅम, जेली आणि मुरंबा बनवू शकता. 2200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे किंमत पाहिली तर तुमची किंमत सुमारे 5,07,600 रुपये येईल. हे विकल्यानंतर, तुम्हाला सुमारे 7,10,640 रुपये मिळतील. म्हणजे तुम्हाला सुमारे 2,03,040 रुपये नफा मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला दरमहा 17 हजार रुपये मिळतील.
7 / 8
इमारतीवरील गुंतवणूक ठिकाणानुसार बदलू शकते. दुसरीकडे, जर इमारत तुमची स्वतःची असेल, तर तुमचा खर्च कमी होऊ शकेल.यामुळे तुमचा नफा लक्षणीय वाढेल.
8 / 8
जर सुरुवातीला तुम्हाला व्यवसाय सुरू करताना आर्थिक समस्या येत असतील तर तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या मुद्रा कर्ज योजनेची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज सहज मिळेल.
टॅग्स :businessव्यवसाय